तरुणांचे लसीकरण लवकर व्हावे, नातवंडांचीही चिंता मिटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:09 AM2021-05-21T04:09:53+5:302021-05-21T04:09:53+5:30

ज्येष्ठांचे मत : सरकारने लसींचा पुरेसा पुरवठा करण्याची मागणी डमी क्रमांक - 730 लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ज्येष्ठांचे ...

Young people should be vaccinated early, grandchildren should also be worried | तरुणांचे लसीकरण लवकर व्हावे, नातवंडांचीही चिंता मिटेल

तरुणांचे लसीकरण लवकर व्हावे, नातवंडांचीही चिंता मिटेल

Next

ज्येष्ठांचे मत : सरकारने लसींचा पुरेसा पुरवठा करण्याची मागणी

डमी क्रमांक - 730

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ज्येष्ठांचे लसीकरण समाधानकारक झाले असतानाच आता तरुणांचे लसीकरण कधी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या घरात ज्येष्ठ आहेत व स्वत:चे लसीकरण झाले आहे अशांना घरातील तरुणांच्या लसीकरणाची चिंता सतावते आहे. तरुण कामानिमित्ताने जास्त वेळा घराबाहेर जातात. मुले, सुना यांचे लसीकरण झाल्यास नातवंडांचीही काळजी मिटेल, असे मत ज्येष्ठांनी व्यक्त केले आहे.

आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५-६० या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. काहींचा केवळ पहिला डोस घेऊन झाला आहे, तर काहींचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. लसीकरणासाठी ज्येष्ठांना खूप धावपळ करावी लागते आहे. १ मेपासून १८-४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. मात्र, लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे सध्या तरुणांचे लसीकरण थांबवण्यात आले आहे. त्यामुळे ज्येष्ठांना मुलांच्या लसीकरणाची चिंता सतावते आहे. तरुण वर्ग कमावता असल्याने खासगी हॉस्पिटलमध्येही पैसे खर्च करूनही लस घेऊ शकतात. त्यामुळे त्यांचे लसीकरण लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी ज्येष्ठांकडून केली जात आहे.

------

कोरोनाने अनेकांच्या आयुष्यात संकट निर्माण केले आहे. अनेकांनी आपल्या जवळची माणसे गमावली आहेत. लसीकरणातून साथीवर नियंत्रण मिळवता येऊ शकते. ज्येष्ठांचे लसीकरण बऱ्यापैकी झाले आहे. मात्र, तरुणांचे लसीकरण थांबवणे चुकीचे आहे. आम्हाला पालक म्हणून त्यांची काळजी वाटते, तसेच तेही लहान मुलांचे पालक आहेत. तरुणांचे लसीकरण झाले तर नातवंडांचीही चिंता मिटेल आणि तिसरी लाट रोखता येईल.

- रागिणी लिमये

-----

सरकारने अठरा वर्षांपूर्वी सर्वांना लवकरात लवकर लक्ष देणे गरजेचे आहे. माझ्या मुलांना नोकरीनिमित्त घराबाहेर जावे लागते, त्यामुळे घरच्या घरी वाफ घेण्यासारखे उपाय आम्ही करतोच. परंतु लस घेतल्यानंतर निश्चिंत वाटते. माझ्या मुलांना लस मिळाली तर नातवंडांची काळजीही कमी होईल. त्यामुळे शासनाने लसींच्या प्रमाण वाढवून तरुणांचे लसीकरण लवकरात लवकर सुरू करावे अशी मनापासून इच्छा आहे.

- सरला दिलीप परदेशी

------

घरातली तरुण मंडळी कामाच्या निमित्ताने घराबाहेर जात असतात. बाहेर त्यांचा अनेक लोकांशी संपर्क येतो. त्यांच्यामुळे घरातील इतरांना बाधा होऊ शकते. त्यामुळे तरुणांना प्राधान्याने लस द्यायला हवी. त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी असल्याने त्यांचे संरक्षण व्हायला हवे. कोरोनाचा धोका सर्वच वयोगटातील लोकांना जाणवतो आहे. त्यामुळे वयाची अट न ठेवता घरोघरी प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण होणे गरजेचे आहे. तरच, आपण कोरोनाला हरवू शकू.

- सुनील आणि अमृता कुलकर्णी

-------

जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण

पहिला डोस दुसरा डोस

ज्येष्ठ 770143 268052

४५ ते ६० 806788 137138

१८ ते ४४ 50089 ----

Web Title: Young people should be vaccinated early, grandchildren should also be worried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.