सोशल मीडियावरील तरुणांनी एकत्र येत गरजूंना दिली मायेची ऊब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:08 AM2020-12-07T04:08:42+5:302020-12-07T04:08:42+5:30
पुणे : शहरात कडाक्याची थंडी पडू लागली आहे. परंतु अशा थंडीत देखील रस्त्यावर राहणारी मुले कपडे न घालता फिरत ...
पुणे : शहरात कडाक्याची थंडी पडू लागली आहे. परंतु अशा थंडीत देखील रस्त्यावर राहणारी मुले कपडे न घालता फिरत असतात. अनेकांकडे रात्री झोपताना अंगावर ब्लँकेट देखील नसते. अशा रस्त्यावरील गरजूंना बॅकपॅकर्स आणि ट्रॅव्हलर्स इंडिया या फेसबुक ग्रुपमधील तरुणांनी पुढे येत कपडे आणि ब्लँकेटच्या माध्यमातून मायेची उब दिली.
बॅकपॅकर्स आणि ट्रॅव्हलर्स इंडियाचे सुनील शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आभा तळवलकर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. सुनील शर्मा यांनी या उपक्रमासाठी तरुणाईला आवाहन केले होते. त्याला पुण्यातील तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रेल्वे स्टेशन, बसस्थानक, सिग्नल आदी ठिकाणी राहणाºया मुलांना कपडे देण्यात आले. याशिवाय सॅनिटायजर आणि मास्कचे देखील वाटप करण्यात आले. पुण्याच्या वेगवेगळ््या भागातील तरुणांनी कपडे आणि ब्लँकेट एकत्र केले आणि त्याचे वाटप देखील केले. या उपक्रमासाठी ५० पेक्षा जास्त तरूण एकत्र आले होते. पर्यटनाच्या माध्यमातून एकत्र येत सामाजिक बांधिलकी तरुणाईने जपली.
------
पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आपले अनुभव इतरांसोबत शेअर करण्यासाठी या ग्रुपची ३ वर्षापूर्वी सुरुवात झाली. सध्या १ लाख ६० हजार तरुण या ग्रुपसोबत जोडले गेले आहेत. या तरुणांनी पर्यटनासोबतच सामाजिक बांधिलकी जपत गरजूंसाठी काम करावे, या उद्देशाने सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.
- आभा तळवलकर