भोसरीत युवा मतदार ठरणार निर्णायक; २० ते ४० वयोगटातील ३ लाख ६ हजार ८०२ मतदार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 09:37 AM2024-11-19T09:37:48+5:302024-11-19T09:37:48+5:30

विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचारतोफा थंडावल्या आहेत. बुधवारी (दि.२०) प्रत्यक्ष मतदान होणार

Young voters will be decisive in Bhosari; 3 lakh 6 thousand 802 voters in the age group of 20 to 40 | भोसरीत युवा मतदार ठरणार निर्णायक; २० ते ४० वयोगटातील ३ लाख ६ हजार ८०२ मतदार

भोसरीत युवा मतदार ठरणार निर्णायक; २० ते ४० वयोगटातील ३ लाख ६ हजार ८०२ मतदार

पिंपरी : विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचारतोफा थंडावल्या आहेत. बुधवारी (दि.२०) प्रत्यक्ष मतदान होणार आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघातील २० ते ४० वयोगटातील मतदारांची संख्या ३ लाख ६ हजार ८०२ असून, हे भोसरी मतदारसंघातील आमदार ठरविणार असल्याने युवा मतदार निर्णायक ठरणार आहेत.
 

वयोगटानुसार मतदार संख्या
वयोगटानुसार मतदार संख्या


मतदारसंघात १८ ते १९ वयोगटातील नवमतदारांची संख्या १३ हजार ३०७ आहे. यामध्ये ७ हजार ७८३ पुरुष तर ५ हजार ५२३ महिला व अन्य एका मतदाराचा समावेश आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघात एकूण ६ लाख ८ हजार ४२५ मतदार आहेत. त्यापैकी ३ लाख २८ हजार २८० पुरुष तर २ लाख ८ हजार ४८ महिला तर अन्य ९७ मतदार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकांचा विचार केला तर, २०१९ च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत ५६.६१ टक्के मतदान झाले होते. तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ४९.४१ टक्के मतदान झाले आहे. यंदाच्या विधानसभा मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहेत. शहरात चिंचवडमध्ये सर्वाधिक मतदार आहेत. तर त्याखालोखाल भोसरी मतदारसंघामध्ये मतदार आहेत.

शंभरी ओलांडलेले २०० हून अधिक मतदार

भोसरी विधानसभा मतदारसंघात वयाची शंभरी ओलांडलेले एकूण २१२ मतदार आहेत. यामध्ये १०० ते १०९ वयोगटातील २०८ मतदार आहेत. तर ११० ते ११९ वयोगटातील दोन मतदार आहेत. याशिवाय १२० पेक्षा अधिक वय असलेले एक महिला व एक पुरुष अशा एकूण दोन मतदारांचा समावेश आहे.
 

 

Web Title: Young voters will be decisive in Bhosari; 3 lakh 6 thousand 802 voters in the age group of 20 to 40

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.