साखरपुड्यानंतर लग्नास टाळाटाळ केल्याने तरुणीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:10 AM2021-05-30T04:10:47+5:302021-05-30T04:10:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पाच वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर त्यांचा साखरपुडा झाला. त्यानंतर लग्न करण्यास टाळाटाळ करून मानसिक त्रास दिल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पाच वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर त्यांचा साखरपुडा झाला. त्यानंतर लग्न करण्यास टाळाटाळ करून मानसिक त्रास दिल्याने एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
पूर्णा बंशपती चौधरी (वय २३, रा. चंदननगर, खराडी) असे या तरुणीचे नाव आहे. या तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्या आत्महत्येचे कारण नमूद केले आहे. ही घटना बोराटेवस्तीतील तिच्या राहत्या घरी शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली.
याप्रकरणी तरुणीचे वडील बंशपती रामशरण चौधरी (वय ४८, रा. खराडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कपिल मदन गोरे, मदन गोरे, संगिता मदन गोरे, शुभांगी मदन गोरे (सर्व रा. थिटेवस्ती, खराडी), विशाल काळे, नरसिंह मुळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
ही तरुणी खासगी कंपनीत नोकरी करत होती. तिचे कपिल गोरे याच्याबरोबर ५ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. काही महिन्यांपूर्वी त्यांचा वाघोली येथील कपिला रिसॉर्टमध्ये साखरपुडा झाला होता. मात्र, त्यानंतर कपिल हा इतर आरोपींच्या सांगण्यावरून तरुणीसोबत लग्न करण्यास टाळाटाळ करीत होता. त्यातूनच या तरुणीने घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने चिठ्ठी लिहिलेली असून त्यात तिने आत्महत्येमागील कारण नमूद केले आहे. त्यानुसार पोलिसांनी ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.