कात्रज चौकामध्ये अपघातात तरुणीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 01:59 PM2024-09-17T13:59:18+5:302024-09-17T13:59:34+5:30

मागील काही दिवसांपासून कात्रज चौकामध्ये अपघाताचे सत्र सुरू असून यामध्ये नागरिकांना जीव गमावावा लागत आहे.

Young woman dies in an accident in Katraj Chowk | कात्रज चौकामध्ये अपघातात तरुणीचा मृत्यू

कात्रज चौकामध्ये अपघातात तरुणीचा मृत्यू

संतोष गाजरे

लोकमत न्यूज नेटवर्क

कात्रज: शहरात सर्वत्र गणेश विसर्जनाची धामधूम सुरू असताना दक्षिण पुण्यात मात्र सकाळी कात्रज चौकामध्ये अपघातात एका तरुणीला जीव गमवावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार कात्रज चौकामध्ये सकाळी साडेसहाच्या सुमारास एक तरुणी वेस्पा दुचाकी वरून कात्रज कोंढवा रोडच्या दिशेने जात असताना अज्ञात टँकरचा धक्का लागल्याने मयुरी या २६ वर्षीय  तरुणीचा जागेवरच मृत्यू झाला.

मागील काही दिवसांपासून कात्रज चौकामध्ये अपघाताचे सत्र सुरू असून यामध्ये नागरिकांना जीव गमावावा लागत आहे. काही दिवसापूर्वीच एका कंत्राटी पीएमपीएल चालकाचा तर एका तरुणीचा कात्रज चौकात मृत्यू झाला होता. त्यामुळे हे अपघात सत्र थांबणार कधी असावा उपस्थित होत असतानाच आज पुन्हा एका अपघातात तरुणीला जीव गमवावा लागला.

कात्रज चौकामध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू असून त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक देखील संथ गतीने सुरू असते. तर काही वाहन चालक देखील गडबडतात. यामुळे अपघात झाल्याचे पाहायला मिळते.सकाळी झालेल्या अपघाता संदर्भात पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत असून मृतदेह ससून येथे पाठवण्यात आला आहे.

Web Title: Young woman dies in an accident in Katraj Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात