पुण्यात क्वारंटाइन सेंटरमधून तरुणी पळून जाताना भलतंच घडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 10:32 AM2021-03-16T10:32:23+5:302021-03-16T10:33:10+5:30

शहरातील एरंडवणे भागातील एका क्वारंटाइन सेन्टरमधून रात्री साडे अकराच्या सुमारास एका युवतीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या मजल्यावरून खाली जाण्याचा तिचा विचार होता

The young woman escaped from the quarantine center in pune | पुण्यात क्वारंटाइन सेंटरमधून तरुणी पळून जाताना भलतंच घडलं

पुण्यात क्वारंटाइन सेंटरमधून तरुणी पळून जाताना भलतंच घडलं

Next
ठळक मुद्देशहरातील एरंडवणे भागातील एका क्वारंटाइन सेन्टरमधून रात्री साडे अकराच्या सुमारास एका युवतीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या मजल्यावरून खाली जाण्याचा तिचा विचार होता

पुणे - राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असताना, पुण्यातही दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. महापालिका व्यवस्थापनावर कोरोना महामारीचा मोठा ताण येत आहे. नागरिकांना सातत्याने प्रशासनाला सहकार्य करण्याचे, कोरोना नियमावली पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, क्वारंटाइन सेंटरमधून काही नागरिक पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याच्या घटनाही समोर येत आहेत. एका 18 वर्षीय युवतीने क्वारंटाईन सेंटरमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

शहरातील एरंडवणे भागातील एका क्वारंटाइन सेन्टरमधून रात्री साडे अकराच्या सुमारास एका युवतीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या मजल्यावरून खाली जाण्याचा तिचा विचार होता. त्यानुसार तिने खिडकीचा वापर करण्याचं ठरवलं आणि झालं भलतचं. ही मुलगी खिडकीच्या गजांमध्ये अडकून बसली. अनेकांनी प्रयत्न केले, पण तिला बाहेर काढता येईना. अखेर अग्निशमन दलाला बोलवावे लागले. त्यांनी मुलीला धीर देत खिडकीचे गज कापून तिची सुटका केली. यावेळी हायड्रलिक कटरचा वापर करावा लागला. कोरोना रुग्ण वाढू नयेत म्हणून क्वारंटाइन सेन्टरसारखी ठिकाणं तयार करावी लागली आहेत. मात्र, तिथूनही नागरिक पळून जात असल्याने प्रशासनाच्या समोर नव्या समस्या उभ्या राहताना दिसत आहेत. ही युवती दुसऱ्या मजल्यावरून खाली जाताना जखमी झाली असती किंवा जीवावर बेतले असते तर गंभीर प्रसंग ओढवण्याची शक्यता होती.
 

Read in English

Web Title: The young woman escaped from the quarantine center in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.