शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणीने ४ लाख गमावले
By भाग्यश्री गिलडा | Published: March 3, 2024 03:08 PM2024-03-03T15:08:42+5:302024-03-03T15:09:15+5:30
गुंतवणूक करून ट्रेडिंग केल्यास चांगला परतावा मिळतो असे सांगून शेअर्स आणि आयपीओ यामध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले
पुणे : शेअर मार्केटमध्ये ट्रेंडिंग करून गुंतवणुकीच्या नादात ४ लाख १६ हजार रुपये गमावल्याची प्रकार घडला आहे. याप्रकरणी भूपेंद्र नथ्थू बागड (वय-५५, रा. शिवणे) यांनी शनिवारी (दि.२) उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत म्हटल्यानुसार नुसार ही घटना २३ नोव्हेंबर ते २ मार्च डिसेंबर २०२४ या दरम्यानचा काळात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादींच्या मुलीला सायबर चोरट्याने व्हॅट्सऍपवरून संपर्क साधला. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक शिकवण्याचा बहाणा केला. गुंतवणूक करून ट्रेडिंग केल्यास चांगला परतावा मिळतो असे सांगितले. त्यानंतर शेअर्स आणि आयपीओ यामध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यांच्या ऍपवर शेअर ट्रेडिंग मधून फायदा झाल्याचे दिसून येत होते. आणखी पैसे मिळतील असे आमिष दाखवून फिर्यादींच्या मुलीला ४ लाख १५ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाय एन शेख करत आहेत.