'माझ्या जीवाला धोका आहे', तरुणीने केला थेट पोलीस आयुक्तांनाच मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 04:22 PM2021-12-03T16:22:34+5:302021-12-03T16:23:24+5:30

मेसेजची तातडीने दखल घेत सामाजिक सुरक्षा पथकातील अधिकाऱ्यांनी धावपळ करत मुलीचा आणि तीच्या आई – वडीलांचा शोध घेतला. मात्र, त्यानंतर तरुणी मानसिक रुग्ण असून ती नेहमीच असे कृत्य करत असल्याचे समोर आले

the young woman sent a message directly to the Commissioner of Police | 'माझ्या जीवाला धोका आहे', तरुणीने केला थेट पोलीस आयुक्तांनाच मेसेज

'माझ्या जीवाला धोका आहे', तरुणीने केला थेट पोलीस आयुक्तांनाच मेसेज

Next

पिंपरी : मला काही मुलांकडून धमक्या मिळत आहेत, ते माझा लैंगिक छळ करत आहेत. त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे, असा मेजेस एका तरुणीने पोलिसआयुक्त कृष्णप्रकाश यांना केला. या मेसेजची तातडीने दखल घेत सामाजिक सुरक्षा पथकातील अधिकाऱ्यांनी धावपळ करत मुलीचा आणि तीच्या आई – वडीलांचा शोध घेतला. मात्र, त्यानंतर तरुणी मानसिक रुग्ण असून ती नेहमीच असे कृत्य करत असल्याचे समोर आले.

मला काही मुलांकडून धमक्या मिळत आहेत. ते माझा लैंगिक छळ करत आहेत. मी या कृतीकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले. परंतु, त्यांचे त्रास देणे वाढतच आहे. ते माझ्या जीवाला धोका पोहचवू शकतात. मी परराज्यातील असून शिक्षणासाठी पुणे येथे आली आहे. मला वेगवेगळ्य़ा फोनवरून सारख्या धमक्या मिळत आहेत. मी एकटी असून काय करावे हे मला सुचत नाही. मोबाईल नेटवर्कच्या अडचणीमुळे मला संपर्क करण्यास अडचणी येत आहेत, अशा आशयाचा व्हॉट्सअप मेसेज गुरुवारी दुपारच्या वेळेत पोलिसआयुक्त कृष्णप्रकाश यांना आला. त्यापाठोपाठ लगेचच ईमेलही प्राप्त झाला. या प्रकाराची गंभिरता लक्षात घेत पोलिस आयुक्तांनी सामाजिक सुरक्षा पथकाचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांना संबंधित तरुणीची तत्काळ मदत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, पोलिस निरीक्षक चव्हाण यांनी एक टीम तयार करून तरुणीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु केला.

ती सध्या मानसिक आजाराने ग्रस्त 

ज्या क्रमांकावरून तरुणीने मेसेज केला होता त्या क्रमांकावर पोलिसांनी मेसेज तसेच कॉल केला. ईमेलही केला. मात्र, संबंधित तरुणी पोलिसांचा कॉल कट करून वारंवार पोलिस आय़ुक्त आणि इतर पोलिसांनी मिस्ड कॉल देत राहिली. हे प्रकरण काहीतरी वेगळे असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यांनी तांत्रिक विश्लेषण तरुणीच्या आई – वडीलांशी संपर्क साधला. मात्र, त्यानंतर वेगळेच सत्य बाहेर आले. आमची मुलगी पुण्यात शिक्षण घेत असून आमच्यासोबतच राहते. ती सध्या मानसिक आजाराने ग्रस्त आहे. ते पाठविलेल्या मेसेजमध्ये ईमेल मध्ये कोणतेही तथ्य नाही, असे तीच्या पालकांनी सांगितले. तसेच आम्ही आज नाशिक येथे देवदर्शनासाठी आलो असून असा कोणताही प्रकार घडलेले नाही. आमची कोणतिही तक्रार नसल्याचे तीच्या पालकांनी सांगितले.

Web Title: the young woman sent a message directly to the Commissioner of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.