Video: पुण्याच्या कर्वेनगरमध्ये पोलीस चौकीत तरुणीचा धिंगाणा; महिला पोलिसाला बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 03:41 PM2022-01-03T15:41:58+5:302022-01-03T16:07:48+5:30

पुण्याच्या कर्वेनगरमध्ये शाहु कॉलनी याठिकाणी एक तरुणी आणि तीची आई दगड विटा आणि धारदार शस्त्राने गाड्यांची तोडफोड करत होत्या.  त्यावेळी स्थानिक नागरिकांनी पोलीस कंट्रोलला फोन करून माहिती दिली

The young woman was stabbed by the police for causing dirt in front of the house Woman beaten to police in pune | Video: पुण्याच्या कर्वेनगरमध्ये पोलीस चौकीत तरुणीचा धिंगाणा; महिला पोलिसाला बेदम मारहाण

Video: पुण्याच्या कर्वेनगरमध्ये पोलीस चौकीत तरुणीचा धिंगाणा; महिला पोलिसाला बेदम मारहाण

googlenewsNext

कर्वेनगर : पुण्याच्या कर्वेनगरमध्ये शाहु कॉलनी याठिकाणी एक तरुणी आणि तीची आई दगड विटा आणि धारदार शस्त्राने गाड्यांची तोडफोड करत होत्या.  त्यावेळी स्थानिक नागरिकांनी पोलीस कंट्रोलला फोन करून माहिती दिली. तत्परता दाखवत वारजे पोलीस ठाण्याचे बीट मार्शल घटनास्थळी दाखल झाले.  पोलिसांनी तरुणी आणि तिच्या आईला कर्वेनगर मधील पोलीस चौकीला आणले. त्यावेळी तरुणीने चौकीमधील दामिनी पथकातील महिला पोलिसाला शिवीगाळ करता मारहाण केली. 

याप्रकरणी सुनिता ज्ञानेश्वर दळवी (वय ४५, रा. गुरुप्रसादा कॉलनी, कर्वेनगर) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी संजना किरण पाटील (वय ४०) आणि मृणाल किरण पाटील (वय २१, रा. गुरुप्रसाद कॉलनी, कर्वेनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे शेजारी शेजारी राहण्यास आहे. फिर्यादी यांच्या श्वानाने आरोपीच्या घरासमोर घाण केली. त्याचा राग मनात धरुन मृणाल पाटील ही फिर्यादी यांच्या मुलाच्या अंगावर धावून गेली. फिर्यादींना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. संजना पाटील यांनी कोयत्याने फिर्यादी यांच्या दोन दुचाकीवर वार करुन तोडफोड करुन नुकसान केले. पोलीस चौकीत गेल्यावर तरुणीने महिला पोलिसावर हल्ला केला. "माझा गुन्हा काय असे अपरोधितपणे विचारत होती " त्याच वेळी शेजारी उभे असणारे पोलिसही बघ्याची भूमिका घेताना दिसत होते. इतक्या वरच ही तरुणी थांबली नसून एका पोलीस काँन्टेबल वर्दीवर असताना त्यांच्या शर्टची बटण तोडली. त्यावेळी संबंधित ड्युटीवर असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला दुर ढकलले.

तरुणी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे चौकीत तक्रारी प्रक्रिया चालू असतानाही तरुणी आणि महिला चौकीतून निघून गेल्या. फिर्यादी करत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: The young woman was stabbed by the police for causing dirt in front of the house Woman beaten to police in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.