Pune: मशीनमध्ये डोके अडकून तरुण कामगाराचा मृत्यू, चाकण औद्योगिक परिसरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 02:03 PM2024-01-11T14:03:25+5:302024-01-11T14:03:34+5:30
जेबीएम कंपनीत ते ऑपरेटर म्हणून काम करीत होते...
महाळुंगे (पुणे) :चाकण औद्योगिक परिसरात जेबीएम कंपनीत मशीनमध्ये डोके अडकून कामगाराचा अपघाती मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. ६) घडली. गुलजर आलमगीर अन्सारी (वय २१, सध्या रा. खालुंब्रे, मूळ रा. चेनारी, जि. रोहतास, बिहार) असे मृत कामगारांचे नाव आहे.
जेबीएम कंपनीत ते ऑपरेटर म्हणून काम करीत होते. जेबीएम कंपनीत वाहन निर्मिती उद्योगाशी निगडीत वस्तू तयार केल्या जातात. अन्सारी हे जेबीएम कंपनी महाळुंगे येथे रोबोट मशीनवर काम करीत असताना त्यांचे डोके रोबोट मशीनमध्ये अडकून, डोके दबल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी चाकण येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले; परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या घटनेनंतर मृत्यू झालेल्या कामगाराचे नातेवाईक आक्रमक झाले होते. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी ताब्यात घेतला.