तरुणांनो जगात कोठेही नोकरीस जाण्याची तयारी ठेवा; यश नक्कीच मिळेल - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 04:01 PM2023-01-22T16:01:36+5:302023-01-22T16:02:04+5:30

विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात नवीन शोध व संशोधनामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर आत्मविश्वासाने उभे रहाण्याची संधी मिळाली

Youngsters are ready to go anywhere in the world Success will surely come Sharad Pawar | तरुणांनो जगात कोठेही नोकरीस जाण्याची तयारी ठेवा; यश नक्कीच मिळेल - शरद पवार

तरुणांनो जगात कोठेही नोकरीस जाण्याची तयारी ठेवा; यश नक्कीच मिळेल - शरद पवार

Next

पुणे : विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात नवीन शोध व संशोधनामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर आत्मविश्वासाने उभे रहाण्याची संधी मिळाली आहे. त्याचा फायदा तरुण पिढीने घ्यावा. परंतु तरुणांनी या साठी जगात कोठेही नोकरीस जाण्याची तयारी ठेवणे गरजेचे असल्याचे माजी केंद्रीय कृषी मंत्री व अखिल भारतीय मराठा शिक्षण परीषदेचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले आहे.

अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती, सायन्स अँड टेक्नोलॉजी पार्क पुणे आणि एस एम ई चेंबर ऑफ इंडिया यांचे संयुक्त विद्यमाने पर्वती येथील शाहू कॉलेजच्या आवारातील अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च महाविद्यालयाच्या संकुलात स्थापन करण्यात आलेल्या डीएसटी प्रयास शाळा,रोबोटिक्स प्रयोगशाळेचे उद्घाटन व हेरीटेज क्लबच्या लोगोचे अनावरण शरद पवार यांचे हस्ते करण्यात आले . त्यावेळी ते बाेलत होते. 

शरद पवार म्हणाले, नवीन पिढीला तयार करताना तंत्रज्ञाच्या आधाराची गरज असून त्यामुळे देशाच्या विकासासाठी ते विविध संशोधन करून विकास करतील. यासाठी शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभे करून स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. स्टार्टअप व अन्य योजनांमुले ८० टक्के विद्यार्थ्यांना नोकरीची संधी होणार आहे. संशोधन व तंत्रज्ञानामुळे देशाचे उत्पादन वाढवण्याच्या प्रयत्नात तरुणांना नक्कीच यश मिळेल.

सायन्स अँड टेक्नोलॉजी पार्क चे कार्यकारी संचालक डॉ.राजेंद्र जगदाळे म्हणाले, नवीन उद्योग व्यावसाय सुरु करण्यासाठी आम्ही विविध स्तरावर प्रयत्न करत आहोत. स्टार्टअपच्या माध्यमातून व्यवसाय करू इच्छिणाऱ्या नवीन उद्योजकांना संस्थेमार्फत सत्यात्याने प्रोत्साहन देत आहोत. 

Web Title: Youngsters are ready to go anywhere in the world Success will surely come Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.