तरुणांनी बाबासाहेब जाणून घ्यावेत : बापट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 03:14 AM2018-04-16T03:14:59+5:302018-04-16T03:14:59+5:30
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्यातील कायदेतज्ज्ञ, पत्रकार, तत्त्वज्ञ, राजकारणी समजून घेऊन त्यांचे विचार आपण आचरणात आणावेत. तरुणांनी बाबासाहेबांना अभिप्रेत कार्य उभारण्यासाठी शिक्षणाकडे गांभीर्याने पाहायला हवे. तरुणाच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी हा पुस्तकवाटपाचा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल,’ असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.
पुणे - ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्यातील कायदेतज्ज्ञ, पत्रकार, तत्त्वज्ञ, राजकारणी समजून घेऊन त्यांचे विचार आपण आचरणात आणावेत. तरुणांनी बाबासाहेबांना अभिप्रेत कार्य उभारण्यासाठी शिक्षणाकडे गांभीर्याने पाहायला हवे. तरुणाच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी हा पुस्तकवाटपाचा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल,’ असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीच्या वतीने ‘नाचून मोठे होण्यापेक्षा वाचून मोठे होऊया’ उपक्रमाअंतर्गत महापुरुषांची १० हजार चरित्र पुस्तके वाटण्यात आली. छत्रपती-फुले-शाहू-आंबेडकर विचाररथातून या पुस्तकांचे वाटप सारसबाग परिसरातील अण्णा भाऊ साठे पुतळ्यासमोर झाले.
नगरसेवक महेश लडकत, सिस्टर मरिसा ए. सी., माजी नगरसेवक राहुल तुपेरे, बाळासाहेब दाभेकर, संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत कांबळे, श्री आदिशक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष दत्ता पवार, सचिव गिरीश शिंदे, सचिन गजरमल, गणेश आबनावे, योगेश सुपेकर, संजय पोमण, अजय गायकवाड, दिलीप शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. छत्रपती शिवाजीमहाराज, गौतम बुद्ध, महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शहीद भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, कर्मवीर भाऊराव पाटील आदी महापुरुषांची चरित्रपुस्तके, तसेच भारतीय राज्यघटनाही वाटली.