'तुमचे नगरसेवकपद घालवितो...' नगरसेविकेला ब्लॅकमेल करून मागितली २५ लाखांची खंडणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 09:24 AM2022-09-06T09:24:58+5:302022-09-06T09:25:06+5:30

पुण्यातील आरटीआय कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल

Your corporator post is wasted The corporator was blackmailed and demanded an extortion of 25 lakhs | 'तुमचे नगरसेवकपद घालवितो...' नगरसेविकेला ब्लॅकमेल करून मागितली २५ लाखांची खंडणी

'तुमचे नगरसेवकपद घालवितो...' नगरसेविकेला ब्लॅकमेल करून मागितली २५ लाखांची खंडणी

googlenewsNext

पुणे : बेकायदेशीर बांधकाम केल्याने तुमचे नगरसेवकपद घालवितो, अशी धमकी देऊन नगरसेविकेच्या पतीकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जितेंद्र अशोक भोसले (रा. विमाननगर) असे या आरटीआय कार्यकर्त्याचे नाव आहे. याप्रकरणी एका नगरसेविकेच्या पतीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जितेंद्र भोसले याच्याविरुद्ध यापूर्वी खंडणीचे ३ व इतर ३ गुन्हे दाखल आहेत.

फिर्यादी यांच्या मिळकतीमध्ये बेकायदेशीर बांधकाम करीत असल्याबाबत पुणे महानगरपालिका व पीएमआरडीए येथे नगरसेवक पद रद्द करण्याबाबत जितेंद्र भोसले याने खोटे अर्ज केले होते. त्यावर तपासणी होऊन कोणतेही बेकायदेशीर बांधकाम झाले नसल्याचा निर्वाळा पीएमआरडीएने दिला होता. असे असतानाही महापालिका निवडणुकीत तुमची व तुमच्या पत्नीची सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी करण्याची भीती दाखवून भोसले याने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती.

आराेपीने २३ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष भेटून त्याने २५ लाख रुपये मागितले. त्याबाबत त्यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, त्यावर काही कारवाई झाली नाही. त्यानंतर त्यांनी आता खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार केली. त्यांच्या अर्जाची चौकशी करून विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Your corporator post is wasted The corporator was blackmailed and demanded an extortion of 25 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.