आपले ध्येय व स्वप्न नेहमी मोठी असली पाहिजेत : खासदार गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:17 AM2021-02-23T04:17:16+5:302021-02-23T04:17:16+5:30

पुणे : आयुष्यात जे काही मिळाले त्यावर समाधान मानणाऱ्याºव्यक्ती समाजात खूप दिसतात़ पण काही मंडळी स्वत:चे जीवन यशस्वी ...

Your goals and dreams should always be big: MP Girish Bapat | आपले ध्येय व स्वप्न नेहमी मोठी असली पाहिजेत : खासदार गिरीश बापट

आपले ध्येय व स्वप्न नेहमी मोठी असली पाहिजेत : खासदार गिरीश बापट

googlenewsNext

पुणे : आयुष्यात जे काही मिळाले त्यावर समाधान मानणाऱ्याºव्यक्ती समाजात खूप दिसतात़ पण काही मंडळी स्वत:चे जीवन यशस्वी करून इतरांनाही यशात सामावून घेतात, त्यांचे इतर लोक अनुकरण करतात़ त्यामुळे आपले ध्येय व स्वप्न नेहमी मोठे असले पाहिजे, असे मत व्यक्त करीत खासदार गिरीश बापट यांनी, या ध्येयाला कष्टाची जोड मिळाल्यास आपण आयुष्यात नक्की यशस्वी होऊ असा विश्वास व्यक्त केला़

‘आऱ. डी़ देशपांडे होल्डिंग’ प्रस्तुत ‘लोकमत अ‍ॅच्युअर्स पुणे’ या गौरव सोहळयात, पुण्याच्या सर्वांगीण विकसासाठी विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्याºअसामान्य व्यक्तिमत्त्वांचा गौरव रविवारी करण्यात आला़ या वेळी खासदार बापट बोलत होते़ राज्याचे सार्वजनिक बांधकाम, मृद व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, अभिनेत्री मंदिरा बेदी, आऱ. डी़ देशपांडे होल्डिंगचे प्रमुख आऱ. डी़ देशपांडे या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते़

बापट म्हणाले, जीवनात यशस्वी झालेल्या व्यक्ती इतरांनाही बरोबर घेऊन त्यांना मार्गदर्शन करतात़ तेव्हा ते त्या क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात व त्यांचे इतर जणही अनुकरण करतात़ आयुष्यात प्रत्येकाची झेप ही मोठीच असली पाहिजे व त्याला कष्टाची जोड सातत्याने दिल्यास, ती व्यक्ती त्या-त्या क्षेत्रात पुढे जात असते़ अशाच विविध क्षेत्रांतील यशस्वी व्यक्तींचा गौरव लोकमतने केला हे कौतुकास्पद आहे़

दत्तात्रय भरणे यांनी राज्यातील सामाजिक कामात लोकमत समूहाचा पुढाकार नेहमी असल्याचे सांगितले़ समाजात अनेक व्यक्ती चांगले काम करीत असतात, कोणी तरी त्यांच्या कामाची दखल घेणे आवश्यक असते़ विविध क्षेत्रांत चांगले काम करणाऱ्याºव्यक्तींचा सन्मान करून लोकमतने अशा व्यक्तींच्या कामाची दखल घेऊन इतरांना प्रेरणा देण्याचे काम केले आहे़

फत्तेचंद रांका यांनी लोकमतकडून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनाºएकत्र आणून फॅमिली बाँडिंगचे काम केले जात असल्याबद्दल गौरवोद्गार काढले़ आपले विचार बदला तरच आपले आयुष्य बदलणार आहे़ जो माणूस स्वत:च्या आयुष्याची भाग्यरेषा स्वत: आखतो तो यशस्वी होत असतो़ याचबरोबर जो यशस्वी होतो व जो कायम नंबर वन राहण्यासाठी प्रयत्न करत असतो, त्यांनी आपल्या कामगारांनाही बरोबर घेऊन कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच वागविले तर त्यास पहिल्या क्रमाकांवरून कोणीच हटवू शकत नाही, असा विश्वासही रांका यांनी या वेळी व्यक्त केला़

----------------------------

Web Title: Your goals and dreams should always be big: MP Girish Bapat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.