"तुम्ही नेहमीच उशिरा येता", असे म्हणत पोलीस कर्मचाऱ्याला केली धक्काबुक्की

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 06:20 PM2021-05-27T18:20:59+5:302021-05-27T18:21:19+5:30

दाम्पत्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल

"You're always late," said the police officer | "तुम्ही नेहमीच उशिरा येता", असे म्हणत पोलीस कर्मचाऱ्याला केली धक्काबुक्की

"तुम्ही नेहमीच उशिरा येता", असे म्हणत पोलीस कर्मचाऱ्याला केली धक्काबुक्की

Next
ठळक मुद्देमुख्य नियंत्रण कक्षाकडून मार्केटयार्ड येथील आंबेडकरनगरमध्ये तीन भांडण सुरू असल्याचा काॅल आला होता

पुणे: भांडणे सुरु असल्याचा कॉल मिळाल्यानंतर मदतीसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला तुम्ही पोलीस नेहमी उशिरा येता, असे म्हणत एका दाम्पत्याने धक्काबुक्की केली. याप्रकरणी पोलिसांनी शंकर पोटे (वय ३०, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) याच्यासह पत्नीवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी चंद्रकांत बालाजी केंद्रे (वय ३२) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना मार्केटयार्डमधील आंबेकरनगर येथील गल्ली नं. ३ मध्ये मंगळवारी दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास घडली.

केंद्रे हे मंगळवारी त्यांचे सहकारी धालपे यांच्यासोबत दिवसपाळी मार्शल ड्युटीवर होते. त्यावेळी मुख्य नियंत्रण कक्षाकडून मार्केटयार्ड येथील आंबेडकरनगरमधील गल्ली क्रमांक तीन येथे भांडण सुरू असल्याचा काॅल आला होता. त्यानुसार दोघे मदतीसाठी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा शंकर पोटे "तुम्ही पोलीस नेहमी उशीरा येता", आमचा जीव गेल्यानंतर तुम्ही येणार का? असे म्हणत केंद्रे यांच्या अंगावर धावून गेले. शर्टची कॉलर धरुन धक्काबुकी केली. तसेच पोटे याच्या पत्नीने देखील केंद्रे यांना धक्काबुक्की करून, त्यांच्याविरुद्ध खोटी तक्रार करण्याची धमकी दिली. त्यानुसार केंद्रे यांनी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात पोटे दाम्पत्यांच्या विरुद्ध तक्रार दिलीआहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद खटके अधिक तपास करत आहेत.

Web Title: "You're always late," said the police officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.