Pune News: पुण्यात मेफेड्रॉनची तस्करी करणाऱ्या तरुणास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 18:51 IST2022-10-05T18:49:26+5:302022-10-05T18:51:00+5:30
अमली पदार्थांची विक्री करताना एका तरुणाला अमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे....

Pune News: पुण्यात मेफेड्रॉनची तस्करी करणाऱ्या तरुणास अटक
पुणे : मेफेड्रॉन या अमली पदार्थांची विक्री करताना एका तरुणाला अमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. रोहन काळुराम खुडे (वय-:२६ वर्षे, रा. भांबरे संस्कृती भवन शाळेसमोर, पर्वती दर्शन, पुणे) असे या तरुणाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार हे सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार सचिन माळवे व पांडुरंग पवार यांना बातमी मिळाली की, एक तरुण राऊत बाग जवळील महात्मा फुले चौकात अमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे.
त्यानुसार पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर व कर्मचाऱ्यांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे १ लाख ४ हजार रुपयांचा ६ ग्रॅम ९७० मिलीग्रॅम मेफेड्रॉन हा अमली पदार्थ अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळून आला. त्यामुळे त्याच्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थविरोधी पथक- १ गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अंमलदार सचिन माळवे, पांडुरंग पवार, विशाल दळवी, मनोजकुमार साळुंके, प्रविण उत्तेकर, राहुल जोशी, संदेश काकडे, नितेश जाधव, योगेश मोहिते यांनी केली आहे.