काळविटाच्या शिंगाची तस्करी करणाऱ्या तरुणाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 02:38 PM2019-10-09T14:38:26+5:302019-10-09T14:40:20+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील मुळ गावी जंगलात मिळालेले काळविटाच्या शिंगाची तस्करी करुन ते विकण्याचा प्रयत्न करत होते.
पुणे : अहमदनगर जिल्ह्यातील मुळ गावी जंगलात मिळालेले काळविटाच्या शिंगाची तस्करी करुन ते विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे़.
अजिंक्य नवनाथ शितोळे (वय १९, रा़ विघ्नहरनगर, महेश सोसायटी) बिबवेवाडी) असे या तरुणाचे नाव आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या कार्यालयात बुधवारी सकाळी पोलीस नाईक विल्सन डिसोझा यांना एक तरुण काळविटाच्या शिंगाची विक्री करण्याचा प्रयत्न करीत आहे़. तो बिबवेवाडीत येणार आहे़. त्यानुसार पोलिसांनी अजिंक्य शितोळे याला ताब्यात घेतले़. त्याकडून फिक्कट तपकिरी रंगाचे, इंग्रजी व्ही आकाराचे काळविटाच्या शिंगाचा एक जोड जप्त करण्यात आला आहे़. त्याच्यावर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे़.
शितोळे हा मुळचा अहमदनगर जिल्ह्यातील राहणारा असून पुण्यात शिक्षण घेत आहेत़. तो काही वर्षांपूर्वी गावाला गेला असताना त्याला जंगलात काळविटांचे शिंग मिळाले होते़. तो ते घेऊन पुण्यात आला होता़. हे शिंग तो टाकून देणार होता, असे त्याने पोलिसांना सांगितले़.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस उपनिरीक्षक किरण अडागळे, पोलीस कर्मचारी किशोर शिंदे, मेहबुब मोकाशी, सचिन गायकवाड, विल्सन डिसोझा, नितीन रावळ, संदीप राठोड, अतुल साठे यांच्या पथकाने ही कामगिरी केली़.