Pune: शिवीगाळ केल्याने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, बिल्डरसह १५ जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 11:20 AM2024-02-15T11:20:58+5:302024-02-15T11:44:37+5:30

याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकांसह १५ जणांवर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे....

Youth attempted suicide due to abuse, 15 people including builder booked | Pune: शिवीगाळ केल्याने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, बिल्डरसह १५ जणांवर गुन्हा

Pune: शिवीगाळ केल्याने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, बिल्डरसह १५ जणांवर गुन्हा

पुणे : सोसायटीमधील पार्किंग, टेरेस व इतर सुविधा वापरण्यास नकार देऊन जातिवाचक शिवीगाळ केल्याने तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकांसह १५ जणांवर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत एका २६ वर्षांच्या तरुणाने लोणीकंद पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सचिन जाधव (३९, रा. गोकुळ पार्क, वाघोली), गजानन आबनावे, लता गजानन आबनावे, संग्राम आबनावे, सायली आबनावे, डॉ. पाचारणे व अन्य ९ जण (सर्व रा. सिद्धी अपार्टमेंट, डोमखेल रोड, वाघोली) यांच्यावर गुन्हा दाखल केला. हा प्रकार बकोरी फाटा, सिद्धी अपार्टमेंट येथे १० फेब्रुवारी रोजी दुपारी एक ते रात्री १० वाजेपर्यंत घडला.

अधिक माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. सचिन जाधव हे सोसायटीचे बिल्डर आहेत. दलित लोकांना फ्लॅटची विक्री केली की, त्यांच्या गरिबीचा फायदा उठवून त्यांना फ्लॅटमधून बाहेर काढणे सोपे जाईल, या उद्देशाने जाणूनबुजून दलित लोकांना फ्लॅटची विक्री केलेली असल्याने फिर्यादी व त्यांचा भाऊ यांना जातिवाचक शिवीगाळ केली. सोसायटीत सर्व जणांनी एकत्र येत त्यांची अडवणूक केली. ते राहत असलेल्या सोसायटीमधील कॉमन पार्किंग, टेरेस व मेंटेनन्सचा वापर करण्यास नकार दिला.

फिर्यादी यांच्या भावाला जातिवाचक शिवीगाळ करून काठी, चप्पल आणि हाताने मारहाण केली. त्यामुळे फिर्यादी यांच्या भावाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील करत आहेत.

Read in English

Web Title: Youth attempted suicide due to abuse, 15 people including builder booked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.