Pune: 'आईची काळजी घ्या...' चिठ्ठी लिहून मराठा आरक्षणासाठी युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 07:41 AM2023-11-06T07:41:19+5:302023-11-06T07:42:20+5:30
मराठा आरक्षणावर सरकारची कार्यपद्धती पाहून निराश होऊन चिठ्ठी लिहून त्याच्या गॅस रीपेरिंग दुकानात टोकाचे पाऊल उचलून गळफास घेऊन आत्महत्या केली...
राजगुरुनगर (पुणे ) :मराठा आरक्षणबाबत सरकारची कार्यपद्धती पाहून चिंबळी (ता. खेड ) येथील सिद्धेश सत्यवान बर्गे (वय. २१) ह्या युवकाने (दि. ३ रोजी ) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
मराठा आरक्षणावर सरकारची कार्यपद्धती पाहून निराश होऊन चिठ्ठी लिहून त्याच्या गॅस रीपेरिंग दुकानात टोकाचे पाऊल उचलून गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी दुपारी सिद्धेशने त्याच्या लहान भावाला मी मित्रांसोबत महाबळेश्वरला चाललोय सांगितले होते. रात्री त्याचा फोन लागत नाही म्हणून भावाने त्यांच्या मित्रांना फोन केला असता समजले की तो त्यांच्या सोबत गेला नाही. भावाने शोधाशोध केली असता गॅस रिपेरिंगच्या दुकानात सिद्धेश यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे आढळून आले.
त्या चिठ्ठीत लिहले होते की, मराठा समाजाला सरकार आरक्षण देत नाही. ही कार्यपद्धत पाहून मी आत्महत्या करीत आहे. यास कोणाला दोषी धरू नये. मया सोन्या ,अप्पा, जिजी, आईची काळजी घ्या, असे लिहून त्याची सही खाली केलेली आहे.