युवक काँग्रेस निवडणुकीत पदाधिकारी-अधिकारी वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 04:59 AM2018-09-13T04:59:35+5:302018-09-13T04:59:37+5:30
युवक काँग्रेसच्या विविध पदांसाठी झालेल्या निवडणुकीत ओळखीचा पुरावा म्हणून आधारचे ‘स्मार्ट कार्ड’ ग्राह्य न धरण्यावरून पदाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यामध्ये वादावादी झाली.
पुणे : युवक काँग्रेसच्या विविध पदांसाठी झालेल्या निवडणुकीत ओळखीचा पुरावा म्हणून आधारचे ‘स्मार्ट कार्ड’ ग्राह्य न धरण्यावरून पदाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यामध्ये वादावादी झाली. त्यामुळे पोलिसांना बोलावून पुढील मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
युवक काँग्रेसच्या पदाधिकारी निवडीसाठी सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. ओळखीचा पुरावा म्हणून निवडणूक अधिकाºयाने आधारकार्डची मागणी केली. कार्यकर्त्यांनी आधारकार्डचे स्मार्ट कार्ड दाखवले; मात्र अधिकाºयांनी ते ग्राह्य धरले नाही. त्यावरून वाद निर्माण झाला. या प्रकारामुळे काही काळ निवडणूक प्रक्रिया थांबवण्यात आली होती.
श्रीरामपुरात भिडले काँग्रेसचे कार्यकर्ते
श्रीरामपूर(जि.अहमदनगर) : युवक काँग्रेसच्या पदाधिकारी निवडीसाठी घेण्यात आलेल्या मतदानावेळी दोन गटात हाणामारी झाली. आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या सूनबार्इंनी आपल्या नावावर बोगस मतदान झाल्याचा आरोप केला.