केंद्रीय मंत्री जावडेकर यांच्या घरासमोर युवक काँग्रेसची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:27 AM2020-12-15T04:27:56+5:302020-12-15T04:27:56+5:30
पुणे : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला युवक काँग्रेसच्या वतीने पुण्यात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घरासमोर निदर्शने करून ...
पुणे : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला युवक काँग्रेसच्या वतीने पुण्यात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घरासमोर निदर्शने करून पाठिंबा दिला. केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा यावेळी दिल्या.
कोथरूड पोलिसांनी तासाभरानंतर सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले व नंतर सोडून दिले.
सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता महाराष्ट्र काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या उपस्थितीत युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल मालके, पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, उपाध्यक्ष सौरभ अमराळे यांच्यासहित सुमित नवले, इंद्रजित साळुंखे, निखिल कविश्वर, प्रताप काळे, हृषिकेश साठे, अभिजित रोकडे, कुणाल काळे, प्रताप शिलीमकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या कोथरूडमधील मयूर कॉलनीत असलेल्या घरासमोर जमा झाले.
पाऊस सुरू झाला तरीही सर्वजण घरासमोरच ठिय्या देऊन बसले होते. तासाभराने कोथरूड पोलिस तिथे आले. त्यांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन तिथून हलवले व नंतर सोडून दिले.
केंद्र सरकार देशातील शेतकर्यांना नको असलेले शेती कायदे त्यांच्यावर लादत आहे, सरकारी यंत्रणेचे साह्य घेत सत्तेच्या जोरावर शेतकरी आंदोलन दडपून टाकण्याचा केंद्र सरकारचा डाव काँग्रेस यशस्वी होऊ देणार नाही, असे यावेळी मोरे यांनी सांगितले.