युवकांनी केले संपूर्ण गावाचे केले निर्जंतुकीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:11 AM2021-05-10T04:11:13+5:302021-05-10T04:11:13+5:30

पेठ येथील रूद्रांश प्रतिष्ठानच्या युवकांनी आपला मित्र तुषार तोडकर याचा वाढदिवस साजरा न करता वाढदिवसावर होणारा सारा खर्च गाव ...

The youth disinfected the whole village | युवकांनी केले संपूर्ण गावाचे केले निर्जंतुकीकरण

युवकांनी केले संपूर्ण गावाचे केले निर्जंतुकीकरण

Next

पेठ येथील रूद्रांश प्रतिष्ठानच्या युवकांनी आपला मित्र तुषार तोडकर याचा वाढदिवस साजरा न करता वाढदिवसावर होणारा सारा खर्च गाव सॅनिटाईज करण्यासाठी खर्च केला आहे. सुमारे २५ ते ३० तरुण युवक दिवसभर संपूर्ण गाव सॅनिटाईज करण्यासाठी धडपडत होते.

सकाळी ९ वाजता दोन ट्रॅक्टरमध्ये पाण्याचे बॅरेल भरून त्यात औषध टाकत गावातील वेगवेगळ्या ठिकाणी औषधाची फवारणी सुरू करण्यात आली. संपूर्ण दिवसभरात एकूण ३० बॅरेल फवारण्यात आले. गावातील गावठाण परिसर, माळवस्ती, माळीमळा आदी ठिकाणी सॅनिटायझेशन करण्यात आले. सॅनिटायझेशनचा संपूर्ण खर्च तुषार तोडकर याने केला. सॅनिटायझेशन करण्यासाठी रूद्रांश प्रतिष्ठानचे आकाश तोत्रे, ओम शिंदे, सचिन पवार, अनिल भालेराव, ऋषीकेश पवळे, सोमनाथ माठे, अविनाश नेटके, रोहित शेलार, रितेश नेटके, मनोज पवळे, ऋषीकेश गुंजाळ आदी युवकांनी पुढाकर घेतला.

Web Title: The youth disinfected the whole village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.