ऊरूळी कांचन येथे इमारतीवरुन पडून तरुणीचा जागीच मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 04:06 PM2019-06-14T16:06:17+5:302019-06-14T16:11:28+5:30

वेडाच्या भरात राहत्या इमारतीवरुन पडल्यामुळे एक तरूणी जागीच मृत्यूमुखी पडली असल्याची घटना घडली आहे. 

The youth girl death due to fall down building at uruli Kanchan | ऊरूळी कांचन येथे इमारतीवरुन पडून तरुणीचा जागीच मृत्यू 

ऊरूळी कांचन येथे इमारतीवरुन पडून तरुणीचा जागीच मृत्यू 

googlenewsNext

लोणी काळभोर : ऊरूळी कांचन ( ता. हवेली ) येथे  वेडाच्या भरात राहत्या इमारती वरुन पडल्यामुळे एक तरूणी जागीच मृत्यूमुखी पडली असल्याची घटना घडली आहे. 
             पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  या दुर्घटनेत प्रियांका गोविंद जंगम ( वय २४, रा. एस के सेंटर, उरुळी कांचन, ता. हवेली ) मुलगी मृत्यूमुखी पडली आहे. या संदर्भात तिचे वडील गोविंद मल्लिकार्जून जंगम ( वय ५२ ) यांनी फिर्याद दिली आहे. जंगम यांचे उरुळी कांचनमध्ये आश्रम रोडवर बेन्टेक्सचे दुकान आहे. गेल्या सहा महिन्यापासून प्रियांका हिच्या डोक्यावर परिणाम झाला होता. तिच्या वर उरुळी कांचन मधील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. तिच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे ती घरच्यांना काहीही न सांगता चालत निघून जात असे. नातेवाईक तिला परत घरी घेऊन जात असत. आज ( १४ जून ) रोजी पहाटे पावणे सहा वाजता तिने वडिलांना झोपेतून उठवले. मी आश्रमामध्ये फिरायला जाते असे ती वडिलांना म्हणाली. आज तु फिरायला जाऊ नकोस, उद्या सकाळी आपण दोघे फिरायला जाऊ असे, यावेळी वडिलांनी तिला सांगितले. त्यानंतर फ्रेश होऊन गोविंद जंगम तिला पहायला आश्रमात गेले. त्यावेळी ती तेथे दिसला नाही. त्यावेळी त्यांना एका फोनवरुन प्रियांका राहत्या इमारतीवरुन पडल्याची माहिती मिळाली. ते तातडीने तेथे गेले असता प्रियांकाच्या डोक्याला मार लागलेला त्यांना दिसला.  तिच्या डोक्यातून रक्त येत होते. कुणीतरी डॉक्टरांना बोलावून आणले. तिला तपासून डॉक्टरांनी मयत घोषित केले.  पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस करत आहेत.    

 

Web Title: The youth girl death due to fall down building at uruli Kanchan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.