देव तारी त्याला कोण मारी ! कात्रजच्या बोगद्या शेजारील खोल दरीत उडी मारूनही तरुणी जिवंत..

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 04:56 PM2019-04-03T16:56:30+5:302019-04-03T17:02:53+5:30

धनकवडी भागात राहणाऱ्या अस्मिता वाघ (वय २२) हिने रागाच्या भरात कात्रज घाटातील दरीत उडी मारली.

youth girl living who jumping in katraj valley | देव तारी त्याला कोण मारी ! कात्रजच्या बोगद्या शेजारील खोल दरीत उडी मारूनही तरुणी जिवंत..

देव तारी त्याला कोण मारी ! कात्रजच्या बोगद्या शेजारील खोल दरीत उडी मारूनही तरुणी जिवंत..

googlenewsNext

- अभिजीत डुंगरवाल- 
पुणे (कात्रज) : रागाच्या भरातच तिने मंगळवारी रात्री घर सोडले. ती थेट चालत निघाली ती कात्रजच्या घाटाकडे.. राग इतका टोकाचा की पोरीने कात्रजच्या बोगद्या शेजारी असलेल्या खोल दरीत उडी मारली.. पण म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी हीच म्हण खरी ठरावी तसा प्रसंग अस्मिता वाघ या नावाच्या
तरुणीसोबत सोबत घडला..परंतु, उडी मारल्यानंतर ती एका दगडाला अडकल्याने तिचा जीव वाचला. सध्या कात्रज भागात चर्चेचा विषय बनली आहे. धनकवडी भागात राहणाऱ्या अस्मिता वाघ (वय २२) हिने रागाच्या भरात कात्रज घाटातील दरीत उडी मारली. परंतु, एका दगडाला अडकल्याने तिचा जीव वाचला. मात्र, रान डुकरांनी पाया शेजारी घेराव घातल्यामुळे रात्री ९ ते सकाळी ३ वाजेपर्यत तिची मृत्यूशी झुंज चालूच होती. याविषयी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार,  मंगळवारी (दि.२ ) तारखेला सायंकाळी अस्मिता वाघ ही घरातून रागाच्या भरात कात्रज घाटाकडे निघुन गेली होती.ती घाटाजवळ असताना तिच्या ओळखीतील एका व्यक्तीने तिला पाहिले व तिच्या वडीलांना या बाबत फोन वरून कळवले.ती व्यक्ती व तिचे वडील आनंद वाघ यांनी तिला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र तिने रागाच्या भरात रात्री ९ च्या सुमारास कात्रज येथील जुन्या बोगद्याच्या शेजारी असलेल्या खोल दरीत उडी मारली. प्रचंड अंधार असल्यामुळे त्यांना ती खाली दिसेनासी झाली.त्यांनी तातडीने कंट्रोल रूमला या प्रकाराची माहिती कळवल.माहिती मिळताच कात्रज चौकीतील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीशैल चवडशेट्टी,पोलीस उपनिरीक्षक सुबराव लाड, व त्यांचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहचले.अंधार असल्यामुळे व दरी खोल असल्याने पोलिसांनी अग्निशामक दलाला घटनास्थळी बोलावले.दोरीच्या सहय्याने पोलीस उपनिरीक्षक सुबराव लाड व पोलीस शिपाई बाळासाहेब नगराळे यांनी ५०० फुट खोल दरीत खाली जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला. दोन तास शोध घेऊनही पोलिसांना ती सापडली नाही. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीशैल चवडशेट्टी,व अग्निशामक दलाचे काही कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांनी बॉटरी चमकवत व जोराने तिच्या नावच्या आरोळ्या देण्यास सुरुवात केली. तिला पोलिसांचे आवाज ही येत होते, मात्र, रानडुकरे पाया शेजारीच असल्यामुळे ती गप्प बसली होती. त्यानंतर ३ च्या सुमारास रानडुकरे त्या ठिकाणाहून इतरत्र गेल्यावर तिने आवाज दिला. पोलिसांच्या सहाय्याने तिला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.ती वर येताच तिच्या नातेवाईकांनी व पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला.

भारती विद्यापीठ पोलिसांनी दाखवलेल्या कर्तबगारीला आनंद वाघ यांनी आपल्या डोळ्यातील अश्रुंनी सलाम केला. पोलिसांच्या या कामगिरीचे कात्रज भागात कौतुक होत आहे.दोन संकटातून अस्मिता वाचल्यामुळे देव तारी त्याला कोण मारी ही म्हण कात्रज भागात चर्चिली जात आहे.
 

Web Title: youth girl living who jumping in katraj valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :katrajकात्रज