कोरोनाबाधितांची भूक भागविण्यासाठी तरुणाईचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:10 AM2021-05-16T04:10:16+5:302021-05-16T04:10:16+5:30
बारामती : कोरोनाची साखळी ‘ब्रेक’ करण्यासाठी बारामतीत सध्या कडक लॉकडाऊन सुरू आहे. यामध्ये हॉटेल खानावळी देखील बंद आहेत. त्यामुळे ...
बारामती : कोरोनाची साखळी ‘ब्रेक’ करण्यासाठी बारामतीत सध्या कडक लॉकडाऊन सुरू आहे. यामध्ये हॉटेल खानावळी देखील बंद आहेत. त्यामुळे हैराण झालेल्या रुग्णांना जेवणाची गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. या रुग्णांच्या मदतीला शहरातील सामाजिक बांधिलकी जपणारी तरुणाई धावून आली आहे.
बारामतीत काही तरुणांनी एकत्र येत कोविड रुग्णांना जेवणाच्या थाळ्या देण्यास सुरवात केली आहे. रुग्णालयातील गरजूंनी येथील पत्रकार अमोल निलाखे यांना एका रुग्णालयातील गरजूंची जेवणाची काही व्यवस्था होईल का, अशी विचारणा केली. त्यानंतर हॉटेल देखील बंद असल्याचे निलाखे यांच्या लक्षात आले. त्यामुळे निलाखे यांनी घरूनच डबा पोहोच करण्यास सुरुवात केली. परंतु दिवसेंदिवस मागणी वाढू लागली. त्यानंतर निलाखे यांनी पत्रकार सचिन मत्रे, आनंद धोंगडे, कौशल गांधी, शुभम सोनवणे, अजित खेडकर, उमेश दुबे आदींना सोबत घेतले.
मात्र, रुग्णालयातून मोठ्या प्रमाणात थाळ्यांची मागणी होवू लागल्याने हे काम घरी होणे शक्य नसल्याचे लक्षात आले. वैभव जगताप यांनी दुपारी तर दीपक मत्रे यांनी रात्री जेवण तयार करून देण्याची जबाबदारी घेतली. सध्या सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण व नातेवाईकांना दिवसाला तीनशे थाळ्या दिल्या जात आहेत. कोरोना रुग्णांना दिल्या जाणाऱ्या गोळ्या-औषधांमुळे त्यांना लवकर भूक लागते. या ग्रुपकडून त्यांना रोज दोन चपात्या, भाजी, वरण, भात, लोणचे असे रुचकर जेवण पुरवले जात आहे. या कामासाठी आता मदतीचे हात पुढे येत आहेत.
बारामतीत काही तरुणांनी एकत्र येत कोविड रुग्णांना जेवणाच्या थाळ्या देण्यास सुरवात केली आहे.
१५०५२०२१ बारामती—०३