एकाच मार्गावर दोन अपघात; डिंगोरे येथील अपघातात तरुण जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 21:13 IST2023-09-20T21:12:32+5:302023-09-20T21:13:44+5:30
सायंकाळी ६:३० वाजण्याच्या दरम्यान बनकर फाट्याजवळ ही दुर्घटना घडली

एकाच मार्गावर दोन अपघात; डिंगोरे येथील अपघातात तरुण जागीच ठार
उदापूर : नगर-कल्याण महामार्गावरील डिंगोरे येथील हॉटेल पुढारीसमोर अपघात होऊन या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला असल्याची माहिती ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली. दरम्यान, याच महामार्गावर पिकअप वाहन पटल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे.
सायंकाळी ६:३० वाजण्याच्या दरम्यान बनकर फाट्यावरून घरी डिंगोरे कडे मोटर सायकल एम. एच.१४ ई.एफ. ८९९७ वरुन जात असताना ट्रक एम.एच.११ ऐ.एल १०५० या चालू गाडीच्या चाकाखाली येऊन सचिन सूर्यवंशी (वय ३६) मूळ राहणार बीड सध्या राहणार मु. पो. डिंगोरे ता. जुन्नर जि. पुणे हा तरुण जागीच ठार झाला आहे.