कोथरूडमध्ये अनैतिक संबंधातून तरूणाचा खून; पोलिसांकडून संशयित आरोपी ताब्यात 

By नितीश गोवंडे | Updated: January 31, 2025 16:42 IST2025-01-31T16:42:23+5:302025-01-31T16:42:32+5:30

पुणे महापालिकेत कंत्राटी पद्धतीवर सफाई विभागात पर्यवेक्षक म्हणून काम करत होता

Youth murdered in Kothrud due to immoral relationship; Police arrest suspect | कोथरूडमध्ये अनैतिक संबंधातून तरूणाचा खून; पोलिसांकडून संशयित आरोपी ताब्यात 

कोथरूडमध्ये अनैतिक संबंधातून तरूणाचा खून; पोलिसांकडून संशयित आरोपी ताब्यात 

पुणे : अनैतिक संबंधातून पुणे महापालिकेतील एका कंत्राटी कर्मचारी तरुणावर कोयत्याने वार करुन त्याचा खून करण्यात आल्याची घटना कोथरूड भागात घडली. याप्रकरणी कोथरूडपोलिसांनी तीन ते चार जणांना ताब्यात घेतले. राहुल दशरथ जाधव (३०, रा. उंबरे, ता. भोर, जि. पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी तीन ते चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून, जाधव याचा भाऊ केतन (२७) याने याबाबत कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल हा पुणे महापालिकेत कंत्राटी पद्धतीवर सफाई विभागात पर्यवेक्षक म्हणून काम करत होता. त्याचे एका महिलेशी प्रेमसंबंध जुळले. महिलेचे राहुल याच्याशी अनैतिक संबंध असल्याची कुणकुण महिलेच्या मुलाला लागली होती. आरोपी मुलगा आणि त्याच्या मित्रांनी संगनमत करुन राहुलचा खून करण्याचा कट रचला.

कोथरूडमधील शास्त्रीनगर भागातील सागर काॅलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकीस्वार राहुल गुरुवारी (दि. ३०) सायंकाळी थांबला होता. त्या वेळी आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी त्याला गाठले. त्याच्यावर कोयत्याने वार केले. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त भाऊसाहेब पटारे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या राहुल याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रात्री उशीरा त्याचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक चेतन धनवडे पुढील तपास करत आहेत.

Web Title: Youth murdered in Kothrud due to immoral relationship; Police arrest suspect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.