पुण्यातील युवकांचे आग्र्याहून व राजगडाकडे गरुडझेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:13 AM2021-08-22T04:13:51+5:302021-08-22T04:13:51+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात अनेक संकटे आली. परंतु यामध्ये मोठे संकट होते 'आग्र्याची कैद' आशेचा एकही किरण नसताना, औरंगजेबाच्या ...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात अनेक संकटे आली. परंतु यामध्ये मोठे संकट होते 'आग्र्याची कैद' आशेचा एकही किरण नसताना, औरंगजेबाच्या हजारो पहारेक-यांच्या कडेकोट बंदोबस्तातून महाराज व शंभूराजे सहीसलामतपणे, औरंगजेबच्या हातावर तुरी देऊन निसटले. ही मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांची गरुडझेप होती. म्हणून या मोहिमेस गरुडझेप संबोधित करून महाराष्ट्रातील मावळ्यांनी आग्रा येथील लाल भुईकोटासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापासून शिवज्योत घेऊन राजगडाकडे रवाना झाले आहेत. महाराजांच्या सेनापतींचे १४ व्या पिढीचे वंशज सरनोबत नरवीर पिलाजी गोळे यांचे वंशज मारुती गोळे, कान्होजी जेधे यांचे वंशज दिग्विजय जेधे, जाधव घराण्याचे गणेश जाधव व तानाजी मालुसरे यांचे वंशज महेश मालुसरे असे ७२ जण या मोहिमेत सहभागी झाले असून. १३ दिवसांत १३00 किमी अंतर पार करून ही प्रेरणादायी शिवज्योत २९ ऑगस्ट रोजी राजगडावर पोहचणार आहे. अॅड. मारुती गोळे यांच्या नेतृत्वाखाली गडभटकंती दुर्ग संवर्धन संस्था, वडगाव मावळ वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशन पुणे, शिवभूमो भ्रमंती ग्रुप कोंढवे धावडे, सरनोबत नरवीर पिलाजी गोळे प्रतिष्ठान, व देशभक्त केशवराव जेधे फाउंडेशन आदींचा या मोहिमेत सहभाग आहे. असा राज्यातील पहिलाच अनोखा उपक्रम असल्याने, खा. छ. संभाजीराजे, खा. सुप्रिया सुळे, मंत्री सतेज पाटील, ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर, संजय बाळा भेगडे, आ. राहुल कुल, आ. सुनील शेळके यांनी या मोहिमेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच आ. राहुल कुल यांनी 13 दिवस आरोग्य सेवेसाठी अँबुलन्स उपलब्ध करून दिली आहे. दिग्विजय जेधे यांनी सांगितले की आग्रा येथे तेथील आमदार योगेंद्र उपाध्याय यांनी आम्हा सर्वांचे स्वागत केले व त्यांच्या हस्ते शिवज्योत प्रज्वलीत करून मोहीम सुरू केली आहे.
210821\img-20210819-wa0024.jpg
आग्र्याहून रायगडाकडे प्रयाण करण्यापूर्वी एकत्रित आलेले युवक