विमानतळाच्या पूर्ततेसाठी तरुणांनी जागृत व्हावे - विजय शिवतारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 11:41 PM2019-01-07T23:41:11+5:302019-01-07T23:41:26+5:30

विजय शिवतारे : भिवरी परिसरात १ कोटी ७६ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन

Youth should be aware of the fulfillment of the airport - Vijay Shivtare | विमानतळाच्या पूर्ततेसाठी तरुणांनी जागृत व्हावे - विजय शिवतारे

विमानतळाच्या पूर्ततेसाठी तरुणांनी जागृत व्हावे - विजय शिवतारे

Next

गराडे : ऐतिहासिक पुरंदर तालुक्याला गौरवशाली परंपरा आहे; परंतु राजकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे पुरंदरचा विकास झाला नाही. मला मिळालेल्या मंत्रिपदामुळे तर कोट्यवधीचा निधी तालुक्यात खेचून आणला, तर नियोजित विमानतळालाही विरोधक प्रखर विरोध करीत आहे. मात्र, विमानतळामुळे पुरंदरचा सर्वांगीण विकास होणार आहे. सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावणार आहे. त्यामुळे पुरंदरकरांनी विशेषत: तरुणांनी विमानतळ होण्यासाठी जागृत व्हावे, असे आवाहन जलसंधारण व जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले.

नाटकरवाडी ( ता.पुरंदर) येथील तुळजाभवानी मंदिरात नाटकरवाडी रस्त्याच्या भूमीपूजनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते शिवतारे बोलत होते. यावेळी पुरंदर पंचायत समिती उपसभापती दत्तात्रय काळे, जि. प. सदस्या ज्योती झेंडे, माजी सभापती दादासाहेब घाटे, उद्योजक अनिल जगताप, हरीभाऊ लोळे, शिवसेना नेते विजय ढोणे, अनिल ढवळे, रामदास कटके, दादासाहेब घिसरे, महादेव फडतरे, प्रकाश कटके, संजय कटके, निखिल गायकवाड, रघुनाथ कटके, सरपंच काजल गायकवाड, उपसरपंच श्रीकांत येळवंडे, माजी उपसरपंच भाऊसाहेब कटके, तानाजी कटके, रघुनाथ ढवळे, ग्रामपंचायत सदस्या मोहिनी लोणकर, प्रकाश चौधरी, ग्रामविकास अधिकारी अविनाश निगडे आदीसह सिद्धेश्वर तरुण मंडळ व हरहर महादेव कावड मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. बापदेव घाट ते बोपगाव रस्ता - १ कोटी २० लाख,भिवरी ते नाटकरवाडी रस्ता - ३० लाख,आस्करवाडी फाटा ते आस्करवाडी रस्ता -२० लाख,भिवरी स्मशानभूमी - ६लाख असे१ कोटी ७६ लाख रुपये किंमतीच्या विकासकामांचे भूमीपूजन ना.शिवतारे यांच्या हस्ते करण्यात आले. दत्तात्रय काळे , ज्योती झेंडे यांनी भाषण केले.प्रास्तविक सखाराम कटके यांनी केले. सुत्रसंचालन नाथाभाऊ कटके व नवनाथ नाटकर यांनी केले.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच नाटकरवाडीला रस्ता
देश स्वतंत्र होऊन ७० वर्षे झाली. परंतु पुणे शहरालगत असणाऱ्या नाटकरवाडीसारख्या वाडीला रस्ता नव्हता. त्यामुळे यापूर्वीच्या सत्ताधाºयांनी काय केले हेच समोर येते. त्यावरून नाटकरवाडीकरांनी कोणती माणसे कामाची आहेत व कोणती बिनकामाची हे लक्षात घेतले पाहिजे असा टोलाही विजय शिवतारे यांनी लगावला.

अजित पवारांप्रमाणे पुरंदरमध्ये मला मतदान करा
बारामतीमध्ये अजित पवार यांना तेथील मतदार भरभरून एकहाती मतदान करतात. यापुढे पुरंदर- हवेलीतील विकासकामांच्या जोरावर येथील मतदारांनी मला विक्रमी मतदान करावे. त्याआधी सासवड येथील ज्या बाजार समितीची जागा धनदांडग्यांनी बळकाविल्या आहेत. त्यांना तेथून हुसकाविण्यासाठी मी प्रयत्न करतो आहेच त्यासाठी जनतेनेदेखील
आवाज उठवावा.
 

Web Title: Youth should be aware of the fulfillment of the airport - Vijay Shivtare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे