युवकांनी चहा विकून केला निषेध, आपच्या युवा आघाडीकडून बेरोजगारीचे बारसे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 03:05 AM2019-02-04T03:05:08+5:302019-02-04T03:05:51+5:30
आम आदमी पक्षाच्या (आप) युवा आघाडीने देशातील बेरोजगारीने ४५ वर्षांतील सर्वोच्च आकडा गाठल्याचा निषेध म्हणून ‘बेरोजगारीचे बारसे’ घातले.
पुणे : आम आदमी पक्षाच्या (आप) युवा आघाडीने देशातील बेरोजगारीने ४५ वर्षांतील सर्वोच्च आकडा गाठल्याचा निषेध म्हणून ‘बेरोजगारीचे बारसे’ घातले. गुडलक चौकामध्ये झालेल्या या आंदोलनामध्ये पदवीधर तरुणांनी चहा विकून केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध केला.
नॅशनल सॅम्पल सर्व्हेच्या बाहेर आलेल्या आकडेवारीनुसार २०१७-१८ मध्ये देशातील बेरोजगारीने ४५ वर्षांतील सर्वोच्च आकडा गाठला आहे. शहरी तरुणांच्या बेरोजगारीचा दर ६.१ टक्के झाला असून बेरोजगार महिलांची संख्याही वाढली आहे.
राज्य संयोजक अजिंक्य शिंदे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. संदीप सोनवणे, सीए योगेश इंगळे, प्राजक्ता देशमुख, मुकुंद किर्दत, चेतन बेंद्रे, महेश स्वामी, पीयूष बागल, तुषार कासार, कशोर मुजुमदार, बजरंग कायगुडे, अमिरुद्दीन पटेल, निखिल देवकर, रिजवान शेख, राज अहिवळे, ओकार मोरे, शहाबाज शेख, संदीप लोखंडे, मनीष राऊत, आशुतोष शिपळकर, अक्षय कर्डिले पाटील, पैगंबर शेख, आनंद अंकुश, श्रीकांत आचार्य, निखिल खळे, वसंत घाटे उपस्थित होते. लोकायत, सिव्हिल इंजिनिअर असो., एमपीएससी स्टुडंट राईट्स, विद्यार्थी अभ्यासिका समिती आदी संघटनांनी या आंदोलनाला सहभाग घेत पाठिंबा व्यक्त केला.
नोटाबंदीमुळे करोडो रोजगार गेले
१ मोदी आणि फडणवीस सरकारची चुकीची धोरणं या परिस्थितीला कारणीभूत आहेत. सरकारी सेवेत हजारो पदे रिक्त असताना शिक्षकभरती व मेगाभरतीचे नुसते आश्वासन देऊन कोणतीच अंमलबजावणी केली नाही. स्किल इंडिया व मुद्रासारख्या योजनांचा फायदा युवकांना होत नाही. नोटाबंदीमुळे करोडो रोजगार गेले आहेत.
२ विद्यापीठांच्या स्वायत्ततेवर गदा आणून युवक-विद्यार्थी यांच्यावर अन्याय केला जात आहे. शिक्षणावर खर्च होत असलेले बजेट यावर्षीदेखील कमी ठेवले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये बेरोजगार युवकांसाठी कोणतीही विशेष तरतूद केली नसून त्यांचे खच्चीकरण करण्याचे काम सातत्याने केले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.