तरुणास लुटले, गुन्हा दाखल : वाघापूर चौफुला येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 02:43 AM2017-10-16T02:43:25+5:302017-10-16T02:43:36+5:30

वाघापूर चौफुला (ता. पुरंदर) येथील हॉटेल पुष्कराजसमोर गुरोळी येथील तरुणास शिंदवणे (ता. हवेली) येथील ८ जणांनी बेदम मारहाण करून सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.

 The youth was robbed, the crime filed: The incident in Waghapur Chaufula | तरुणास लुटले, गुन्हा दाखल : वाघापूर चौफुला येथील घटना

तरुणास लुटले, गुन्हा दाखल : वाघापूर चौफुला येथील घटना

Next

जेजुरी : वाघापूर चौफुला (ता. पुरंदर) येथील हॉटेल पुष्कराजसमोर गुरोळी येथील तरुणास शिंदवणे (ता. हवेली) येथील ८ जणांनी बेदम मारहाण करून सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबद्दल जेजुरी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी अर्जुन राजू खेडेकर (रा. गुरोळी, ता. पुरंदर) जाहिरात व्यावसायिक असल्याने त्यांचे हडपसर येथे कार्यालय आहे. ते दररोज शिंदवणेमार्गे हडपसरला कामानिमित्त जात-येत असतात. गुरुवारी (दि. १२) रात्री १० वाजण्याच्या सुमारास शिंदवणे घाटमार्गे वाघापूरला येत असताना शिंदवणे घाटात एका मोटारीने त्यांचा पाठलाग करीत दोन वेळा त्यांच्या गाडीला दाबण्याचा प्रयत्न केला. गाडीत एकटाच असल्याने घाबरलेल्या अर्जुन खेडेकर यांनी गाडीचा वेग वाढवून थेट वाघापूर चौफुला येथील हॉटेल पुष्कराज गाठले. मागून येणारी आय २० मोटार पाठलाग करीत या ठिकाणी आली. या ठिकाणी रात्रीच्या सुमारास वाहने दाबण्यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. या वेळी आरोपीने नवनाथ महाडिक माझे नाव असून माझ्या नादाला कोणी लागत नाही, असे म्हणत मित्रांना बोलावून घेतले. पाचच मिनिटांत त्या ठिकाणी एक मोटार आली, तसेच त्यातून सहा-सात जण उतरले. त्यांनी खेडेकर यांस मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर फिर्यादीच्या खिशातील ६५ हजार रोख आणि दीड तोळ््याची सोन्याची चेन असा सुमारे १ लाख २ हजार पाचशे रुपये किमतीचा ऐवज हिसकावून घेतला. हॉटेलसमोरच मारहाण होताना हॉटेलचा मालक राकेश शितोळे बघ्याची भूमिका घेऊन गप्प उभा होता. मारहाण करणाºयांना स्थानिक लोकांनी ओळखले असून नवनाथ महाडिक, जगदीश जालिंदर महाडिक, प्रदीप शहाजी महाडिक, ओम शिवाजी महाडिक, प्रकाश महाडिक, पप्पू महाडिक, शिवाजी कुंजीर, गोट्या शिंदे (सर्व जण रा. शिंदवणे, ता. हवेली) यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली आहे.

Web Title:  The youth was robbed, the crime filed: The incident in Waghapur Chaufula

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा