तरुणांचा ओढा पाश्चात्त्य नृत्याकडे
By Admin | Published: April 29, 2015 01:21 AM2015-04-29T01:21:58+5:302015-04-29T01:21:58+5:30
वाढत्या रिअॅलिटी शो व रिमिक्स गाण्यांमुळे तरूणांना हिप-पॉप, सालसा, लॅटिनो, जाज, पास्ता डोबळे, कंटेम्परी, बॉलिवुड अशा पाश्चात्य नृत्याकडे आजच्या पिढीतील तरुणांचा ओढा जास्त असल्याचे दिसून आले आहे.
बेनझीर जमादार ल्ल पुणे
वाढत्या रिअॅलिटी शो व रिमिक्स गाण्यांमुळे तरूणांना हिप-पॉप, सालसा, लॅटिनो, जाज, पास्ता डोबळे, कंटेम्परी, बॉलिवुड अशा पाश्चात्य नृत्याकडे आजच्या पिढीतील तरुणांचा ओढा जास्त असल्याचे दिसून आले आहे.
पालकांचादेखील नृत्य या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला दिसतो. झटपट प्रसिद्धी, पैसा व ग्लॅमर या गोष्टीमुळे पालकांबरोबर मुलेदेखील रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्यास उत्सुक असतात. वाढत्या स्पर्धेमुळे आपल्या मुलाने अभ्यासाबरोबर क्रीडा किवा अभिनय, नृत्य क्षेत्रात नाव कमवावे अशी पालकांची इच्छा असते.
रिमिक्स गाण्यांमुळे तरुणांना क्लासिकल गाणी ऐकण्यात रस नसतो. त्यामुळे साहजिकच ही मुले नृत्य करण्यासाठी पाश्चात्य स्टाइलची निवड करतात. प्रत्येकामध्ये कलेची आवड निर्माण व्हावी व सामान्य नागरिकदेखील या कलेकडे आकर्षित व्हावा या उद्देशाने फ्रेंच डान्सर व मास्टर बॅले जीन जॉर्जस यांच्या जयंतीनिमित्त जागतिक नृत्य दिन साजरा केला जातो.
आजच्या नृत्याबद्दल बोलायचे म्हटले तर, जेव्हा एखाद्या सार्वजिनक ठिकाणी क्लासिकल नृत्य चालू असेल तर त्यामध्ये रस असणारे किंवा तेच प्रेक्षक दिसतील. याउलट वेस्टर्न गाणी असेल तर रस्त्यावरून जाणारा प्रत्येक माणूस त्याकडे आकर्षित झालेला दिसतो.
- रत्ना वाघ, अध्यक्ष, अखिल भारतीय सांस्कृतिक संघ
लावणीमध्ये चेहऱ्यावरील हावभावला जास्त महत्व असते. पण पाश्चात्य नृत्यामध्ये विविध स्टाइलमध्ये स्टंट करायला मिळतो. यामुळे हिपपॉप, जाज या माझ्या आवडत्या स्टाइल्स् आहेत.
-पूजा काळदंते, नृत्यांगना
बॅले डान्सला परंपरा असली तरी इतर ज्या डान्स स्टाइल आहेत त्या करा आणि विसरा याप्रमाणे आहेत. भारत देशात परंपरेला जास्त महत्व असून या कलेच्या साक्षीदार असतात. शास्त्रीय कला या जन्मोजन्मी साथ देणाऱ्या आहेत.
- मनीषा साठे, ज्येष्ठ नृत्यांगना
जागतिक नृत्य दिन आपल्याकडेदेखील साजरा करावा असे नेहमी वाटते. ही एक कला आहे. यामध्ये पाश्चात्य व पारंपरिक नृत्य असा कोणताही फरक करता कामा नये. कारण, पुण्यामध्ये शिकण्यासाठी परदेशातून आलेली कित्येक मुले आमच्या अॅकॅडमीमध्ये लावणी शिकून उत्साहाने बाहेर पडले आहेत. आपण त्यांची संस्कृती शिकण्यास जेवढे उत्साही असतो, तेवढेच ते देखील उत्साही असतात.
- आशिष लोखंडे, कोरिओग्राफर
रिअॅलिटी शो या काही दिवसांसाठीच असतात. दुर्देव आहे की, तरुणांना जे दिसेल साहजिकच ते त्या गोष्टीकडे ओढले जातील. शास्त्रीय नृत्याला हजारो वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे कलाकारांनीदेखील पुढे येऊन मुलांना पारंपरिक नृत्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. शास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमांना तरुणांनी उपस्थित राहिले पाहिजे, तेव्हाच त्यांना त्याचे महत्त्व कळेल. हे नृत्य अध्यात्माकडे नेणारे आहे. ते संस्कार होण्यासाठी मुलांनी हे नृत्य आत्मसात केले पाहिजे.
- स्वाती दैठणकर, ज्येष्ठ नृत्यांगना