युवक-युवतीची आत्महत्या
By admin | Published: October 26, 2016 05:50 AM2016-10-26T05:50:57+5:302016-10-26T05:50:57+5:30
रेल्वेखाली झोकून देऊन युवक आणि युवतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी पहाटे साडेपाचच्या दरम्यान घडली़ कासारवाडी- पिंपरी लोहमार्ग
पिंपरी : रेल्वेखाली झोकून देऊन युवक आणि युवतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी पहाटे साडेपाचच्या दरम्यान घडली़ कासारवाडी- पिंपरी लोहमार्ग अपलाइन क्रमांक १७९/१० या दरम्यान घडली़ रजनी भुपेंद्र सिंग (वय १८, रा़ जाधववाडी, मोशी रोड, पिंपरी) व सूरज वसिष्ठमल त्रिपाठी (वय २४, मु. पो. पेंदा, दुमरिया, उत्तरप्रदेश) असे आत्महत्या केलेल्या युवक-युवतीचे आहे़
लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सव्वासहाची लोकल पुण्याहून लोणावळ्याच्या दिशेने जात असताना, अपलाइन क्रमांक १७९/१० कासारवाडीजवळ मृतदेह पडल्याची माहिती मोटरमनने गार्डला दिली़ गार्डने ही माहिती पिंपरी रेल्वे स्टेशनचे मास्तर आऱ के़ तांबे यांना वॉकीटॉकीवरून दिली़ त्यानुसार रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, रेल्वेच्या हद्दीत युवक -युवतीचा मृतदेह असल्याचे आढळून आले़
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, रजनी आणि तिच्या सोबत असलेल्या युवकाने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्या केली असल्याचा अंदाज आहे़़ दोन्हीही मृतदेहांचे वायसीएम रुग्णालयात विच्छेदन करण्यात आले आहे़ आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण समजू शकले नाही. लोहमार्ग वरिष्ठ निरीक्षक संजय सातव, अधीक्षक प्रभाकर बुधवंत, बबन गायकवाड यांनी घटनास्थळास भेट दिली.(प्रतिनिधी)