‘अनैतिकते’मुळे तरुणाचा खून

By admin | Published: June 10, 2015 04:58 AM2015-06-10T04:58:56+5:302015-06-10T04:58:56+5:30

नातेवाईक महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधामुळे तीन तरुणांनी एकाचा खून केल्याची घटना रविवारी मध्यरात्री सहकारनगर येथे उघडकीस आली.

The youth's murder through 'immorality' | ‘अनैतिकते’मुळे तरुणाचा खून

‘अनैतिकते’मुळे तरुणाचा खून

Next

पुणे : नातेवाईक महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधामुळे तीन तरुणांनी एकाचा खून केल्याची घटना रविवारी मध्यरात्री सहकारनगर येथे उघडकीस आली. खून केल्यानंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी शिताफीने अटक केली. आरोपींना सहकारनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
संजय मुरलीधर बागल (वय ३५, रा. आंबेगाव पठार) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. हन्या ऊर्फ हनुमंत नागनाथ परभले (वय २५, रा. शिवकॉलनी, सूर्या चौक, आंबेगाव पठार), सुनील नारायण निर्मल (वय २८, रा. सावरकर चौक, धनकवडी), सूरज तुकाराम कारले (वय २६, रा. सावरकर चौक, धनकवडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी परभले आणि निर्मल हे मावसभाऊ आहेत. तर, कारले हा त्यांच्याजवळ राहण्यास असून, मानलेला भाऊ आहे. निर्मल याच्या नात्यातील महिलेशी बागल याचे प्रेमसंबंध होते. संबंधित महिलेचेही लग्न झालेले असून तिला १२ वर्षांचा मुलगा आहे. ओळखीच्या असलेल्या बागलला तिघांनीही काही दिवसांपूर्वी समजावून सांगून हे प्रेमसंबंध तोडण्यास सांगितले होते. परंतु, बागल आणि संबंधित महिलेचे प्रेमसंबंध सुरूच राहिल्यामुळे चिडलेल्या आरोपींनी त्याला रविवारी रात्री दारू प्यायला सोबत नेले. (प्रतिनिधी)

Web Title: The youth's murder through 'immorality'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.