प्रसंगावधान राखत युवकांनी दिली रुग्णवाहिकेला वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:12 AM2021-04-23T04:12:23+5:302021-04-23T04:12:23+5:30
ही घटना गुरुवार दिनांक २२ रोजी दुपारच्या सुमारास घडली. मुख्य बाजारपेठेतून एका गंभीर रुग्णाला घेऊन एक रुग्णवाहिका कोविड सेंटरकडे ...
ही घटना गुरुवार दिनांक २२ रोजी दुपारच्या सुमारास घडली. मुख्य बाजारपेठेतून एका गंभीर रुग्णाला घेऊन एक रुग्णवाहिका कोविड सेंटरकडे निघाली होती. वाटेतील कोविडच्याच निमित्ताने रस्ता सील केल्यामुळे ती जागीच उभी राहिली. त्यामुळे प्रसंगावधान प्रशांत मुथा यांनी दोरीच्या साह्याने बांधलेले अडथळे तत्काळ दूर केले व रुग्णवाहिकेला वाट करून दिली.
केडगाव येथे मुख्य बाजारपेठेमध्ये दोन कोविड सेंटर आहेत. प्रशासनाने बोरीपार्धीकडे जाणारा मुख्य रस्ता व वाखारीकडे जाणारा रस्ता सील केला आहे. त्यामुळे हे अडथळे अडचणीचे ठरत आहेत. विशेष म्हणजे एखादी रुग्णवाहिका आल्यास हे अडथळे काढण्यासाठी काहीच पर्याय ठेवलेला नाही. त्या ठिकाणी प्रशासनाने कायमस्वरूपी कर्मचारी नेमणे गरजेचे आहे. रात्री-अपरात्री ॲम्बुलन्समध्ये कोविडचे पेशंट आल्यास अडथळे काढायचे कसे हे त्यांना माहिती नाही. पोलिसांनी हे अडथळे काढावेत किंवा या अडथळ्यांना खाली चाके बसवावेत, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
--
फोटो २२ केडगाव रुग्णवाहिका
केडगाव येथे अडथळा बाजूला करून ॲम्बुलन्सला वाट करून देताना युवक प्रशांत मुथा.