साहेबांसाठी कायपण...', युगेंद्र पवार बारामती मतदारसंघात, अजित दादांविरुद्ध थोपटले दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 01:37 PM2024-03-06T13:37:49+5:302024-03-06T13:46:55+5:30

लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत, काही दिवसातच निवडणुकांची घोषणा होणार असून सर्व पक्षांनी तयारीही सुरू केली आहे. दरम्यान, यावेळी राज्याचे बारामती लोकसभा मतदार संघ चांगलाच चर्चेत आहे.

Yugendra Pawar has started campaigning for Supriya Sule in Baramati Lok Sabha constituency | साहेबांसाठी कायपण...', युगेंद्र पवार बारामती मतदारसंघात, अजित दादांविरुद्ध थोपटले दंड

साहेबांसाठी कायपण...', युगेंद्र पवार बारामती मतदारसंघात, अजित दादांविरुद्ध थोपटले दंड

Sharad Pawar (  Marathi News )  : लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत, काही दिवसातच निवडणुकांची घोषणा होणार असून सर्व पक्षांनी तयारीही सुरू केली आहे. दरम्यान, यावेळी राज्याचे बारामती लोकसभा मतदार संघ चांगलाच चर्चेत आहे. या मतदार संघात खासदार शरद पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात लढत होणार असल्याचे बोलले जात आहे. दोन्ही गटाकडून तयारीही सुरू आहे. अजिप पवार यांच्याकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना तर शरद पवार यांच्याकडून सुप्रिया सुळे निवडणुकीसाठी उतरणार असल्याचे बोलले जात आहे. बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना होणार असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे मतदार संघात दोन्ही बाजूंनी प्रचारही सुरू झाला आहे. अजित पवार यांच्याविरोधात त्यांचा सख्खा पुतन्या युगेंद्र पवार मैदानात उतरल्याचे दिसत आहे. 

... तर सुनेत्रावहिनी पवार बारामतीच्या उमेदवार; NCP च्या प्रदेशाध्यक्षांनीच केली घोषणा

युगेंद्र पवार यांनी बारामती मतदार संघातील गावांना भेटी वाढवल्या आहेत. कालही बारामती तालुक्यातील गावांना युगेंद्र पवार भेट देत होते. यावेळी त्यांनी मी शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले. गावभेटीवेळी युगेंद्र पवार म्हणाले, "बारामतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून काम करत आहे. मला वाटत आता शदर पवार यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं वाटतं, आज बारामतीला ओळख ही शरद पवार यांच्यामुळे मिळाली आहे. आपण बाहेर गेल्यानंतर बारामतीचा आहे म्हटल्यावर लोक आपल्याकडे वेगळ्या नजरेने बघतात, त्यामुळे आता आपल्याला शरद पवार यांना पाठिंबा देण्याची गरज आहे, त्यामुळे मी आता इथे आलो आहे, असंही युगेंद्र पवार म्हणाले. 

"आपल्या मतदार संघात वेगळ्या पद्धतीचे राजकारण होत असेल तर तुम्ही मला संपर्क करा,  बारामतीकरांनी असं राजकारण कधी बघितलेले नाही. दमदाटीला कोणीही घाबरु नका, असं आवाहनही युगेंद्र पवार यांनी यावेळी केले. 

... तर सुनेत्रावहिनी पवार बारामतीच्या उमेदवार

बारामती मतदारसंघात यंदा पवार विरुद्ध पवार असाच सामना पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यंदा राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. त्यासंदर्भात आता प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी घोषणाच केली आहे. 

बारामती लोकसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. कारण या मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच पवार कुटुंबातील दोन व्यक्ती आमने-सामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीत झालेल्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि मतदारसंघातील विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. मात्र सुनेत्रा पवार यांच्या उमदेवारीची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 

Web Title: Yugendra Pawar has started campaigning for Supriya Sule in Baramati Lok Sabha constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.