युवकाच्या खुनाचा शोध लावण्यात मिळाले यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 11:40 PM2018-08-25T23:40:06+5:302018-08-25T23:40:36+5:30
नानवीज (ता. दौैंड) येथील भीमा नदीच्या पात्रात मुंडके नसलेल्या एका युवकाचा मृतदेह दौैंड पोलिसांना आढळून आला. दरम्यान सदरचा प्रकार हा घातपाताचा असल्याचा संशय पोलिसांना आला.
दौैंड : नानवीज (ता. दौैंड) येथील भीमा नदीच्या पात्रात मुंडके नसलेल्या एका युवकाचा मृतदेह दौैंड पोलिसांना आढळून आला. दरम्यान सदरचा प्रकार हा घातपाताचा असल्याचा संशय पोलिसांना आला. परिणामी मयत युवकाची ओळख पटली असून त्याचा खून करण्यात आला असून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली.
भीमाशंकर कलप्पा आतनुरे (वय २१, रा. सरोदेमळा, लोणीकाळभोर) असे मयत युवकाचे नाव असून त्याचा खून करणारे केशव काळभोर (वय ३२), हरिदास शेंडगे, (वय३४), प्रशांत जगताप (वय २५, तिघेही रा. लोणीकाळभोर) यांना अटक केली आहे.
दौैंड पोलीसांना मुंडके नसलेला मृतदेह काही दिवसांपुर्वी सापडला होता. मृतदेह सापडल्यानंतर पोलीसांनी परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्याबाबत चौैकशी केली होती. चौैकशी दरम्यान लोणीकाळभोर पोलीस ठाण्यामध्ये काही दिवसांपुर्वी एक युवक बेपत्ता झाला असल्याची तक्रार संबंधित युवकांच्या आईने दिल्याचे त्यांना समजले. त्यानुसार मयताच्या अंगात फक्त अंडरवेअर होती. मयताचा मृतदेह ससूनला पाठवला. दरम्यान अंडरवेअरवरुन मयताच्या नातेवाईकांनी त्याला ओळखले. मयत भीमाशंकर आतनुरे आणि आरोपी यांच्यात वाद होते. त्यानुसार संशयित म्हणून पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकड— अधिक चौैकशी केल्यानंतर त्यांनी खून केल्याची कबुली दिली. अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश मोरे, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय कापरे , गजानन जाधव,कल्याण शिंगाडे, सचिन बोराटे, बाळासाहेब चोरमले, असिफ शेख, धनंजय गाढवे, अमोल गवळी या पोलीसांनी खूनाच्या गुन्ह्याचा शोध लावला.
असा केला खून...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केशव काळभोर याच्या मुलीची भीमाशंकर छेड काढत होता. दुपारी साडेचारच्या सुमारास तिघाही आरोपींनी रामदरा डोंगर येथे भीमाशंकरला बोलावून घेतले. या वेळी तिघेही आरोपी दारु प्यालेले होते. त्याला समजवत असताना एका आरोपीने त्याच्या मानेवर कुºहाडीचा घाव टाकल्यानंतर त्याच्या शरीरापासून मुंडके वेगळे झाले. काही तासानंतर आरोपींची नशा उतरली. त्यानंतर आपण खून केला असल्याचे लक्षात आले. त्यानंतर आरोपींनी त्याचा मृतदेह गाडीमध्ये टाकला आणि दिवसभर मृतदेह घेऊन फिरत होते. दौैंड तालुक्यातील दहिटणे येथील पूलावरुन त्याच्या अंगातील सगळे कपडे काढून त्याचा मृतदेह नदीत फेकून दिला. मुंडके मात्र गाडीतच ठेवले. काही वेळानंतर मुंडके अन्य दुसऱ्या ठिकाणी कॅनॉलमध्ये टाकून दिले होते.