आदिवासी भागात युवाशक्तीचे ग्रामपंचायतींवर वर्चस्व.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:14 AM2021-01-19T04:14:32+5:302021-01-19T04:14:32+5:30

खेड तालुक्यातील पश्चिम भागातील ग्रामपंचायतींचा निकाल सोमवार (दि.१८) घोषित करण्यात आला. आजपर्यंतचा निकाल पाहता ह्या निवडणुकीत ...

Yuvashakti dominates Gram Panchayats in tribal areas. | आदिवासी भागात युवाशक्तीचे ग्रामपंचायतींवर वर्चस्व.

आदिवासी भागात युवाशक्तीचे ग्रामपंचायतींवर वर्चस्व.

googlenewsNext

खेड तालुक्यातील पश्चिम भागातील ग्रामपंचायतींचा निकाल सोमवार (दि.१८) घोषित करण्यात आला. आजपर्यंतचा निकाल पाहता ह्या निवडणुकीत युवकांचा वरचष्मा असल्याचे स्पष्ट झाले. ३० वर्षांपासून एकदाही निवडणूक न झालेल्या खरोशी ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. याठिकाणी कागजादेवी ग्रामविकास पॅनेलच्या उमेदवारांना यश संपादित करता आले.याहीवेळेस बिनविरोध करण्यासाठी गावाने प्रयत्न केला परंतुु उमेदवार निवडणुकीवर ठाम राहील्यामुळे निवडणुक लागली. ग्रामपंचायतीवर भिमाशंकर देवस्थान चे अध्यक्ष सुरेश कौदरे यांनी ३० वर्षाची सत्ता अबाधित ठेवली. आदिवासी भागातील सात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल घोषित करण्यात आला.

भोरगीरी ग्रामपंचायतीत तीन जागा बिनविरोध झालेल्या असल्याने चार जागेवर मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये दिलीप सोनवणे (१४३), माधुरी काठे(१४९),सिता वनघरे (९२), दत्ता वनघरे (११८)हे निवडून आले. तर दतु हिले, कुंजना शेंगाळे, सुनीता काठे बिनविरोध निवडून आले.

नायफड ग्रामपंचायतीत सात जागा बिनविरोध झाल्या निवडणुक लागलेल्या दोन जागेवर रोहिदास मारुती भाईक (२४७)

सुनील श्रीराम मिलखे(१४४) निवडून आले तर किशोर कावळे,दत्तात्रय माळी,काळुबाई मेमाणे, अलका भाईक,उषा फलके ,स्वाती ठोकळ, करिष्मा बांबळे बिनविरोध निवडून आले.

शिरगाव- मंदोशी संयुक्त ग्रामपंचायतीत पाच जागा बिनविरोध झालेल्या असल्याने उर्वरित दोन जागेवर झालेल्या चुरशीच्या लढतीत शितल प्रकाश आंबेकर(१५५), व एकनाथ देवराम तळपे(१५२) निवडून आले. तर कल्पना लांघी, माधुरी शिर्के, विद्या ठोसर, वनीता मिलखे,नवनाथ ठोसर हे बिनविरोध निवडून आले.

धामणगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीत सात पैकी महिला उमेदवाराच्या अभावी दोन जागा रिक्त राहील्यामुळे व चार जागा बिनविरोध झालेल्या असल्याने फक्त एकच जागेवर मतदान घेण्याची वेळ आली.चुरशीच्या लढतीत अरुण भिमाजी मदगे (१२१) निवडून आले. गिता मदगे, ताईबाई हांडे, दत्ता मेचकर, ज्ञानदेव भांगे हे बिनविरोध निवडून आले.

टोकावडे ग्रामपंचायत निवडणुकीत पाच जागा बिनविरोध झाल्या तर दोन जागेवर भरत सिताराम डामसे (११२),शंकर लहुशेठ गोपाळे( १७७) निवडून आले. .मंजना आढारी, शांताराम डामसे, प्रकाश मु-हे, नवनाथ मेचकर ,शामल गोपाळे. हे बिनविरोध निवडून आले.

खरोशी ग्रामपंचायत निवडणुकीत सुनंदा लांघी(१३४), शंकर लांघी(१२२), भोईर दत्तात्रय(१०६) , गोरक्ष कौदरे(२३६) आशा कौदरे(२४६), रोहिणी लांघी(२५५), कल्पना कौदरे( ११३) हे निवडून आले.

करमोडी ग्रामपंचायतीच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत सातही जागेवर मतदान झाले.यामध्ये कांताबाई गोपाळे(११५), हेमलता गोपाळे(११५), संतोष गोपाळे(११७), दिगंबर गोपाळेे(८०), स्वाती गोपाळे(८२), सुनीता गोपाळे(८३), दामु अभंग(८५). हे निवडून आले.

.

- खरोशी( ता खेड) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी उमेदवारांचे मोठ्या जल्लोषात अभिनंदन करण्यात आले.

Web Title: Yuvashakti dominates Gram Panchayats in tribal areas.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.