ग्रीन हायड्रोजनमुळे कार्बन उत्सर्जन शून्य प्रमाणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:08 AM2021-06-04T04:08:49+5:302021-06-04T04:08:49+5:30
डॉ. दिलावर सिंग : “ग्रीन हायड्रोजन : २१ व्या शतकाचे इंधन” वर व्याख्यान पुणे : “नैसर्गिक साधनसंपत्ती, प्रदूषण आणि ...
डॉ. दिलावर सिंग : “ग्रीन हायड्रोजन : २१ व्या शतकाचे इंधन” वर व्याख्यान
पुणे : “नैसर्गिक साधनसंपत्ती, प्रदूषण आणि निसर्गाचा समतोल साधताना ग्रीन हायड्रोजन २१ व्या शतकातील इंधन म्हणून उत्तम पर्याय ठरत आहे. ग्रीन हायड्रोजनमुळे कार्बनचे उत्सर्जन शून्य प्रमाणात होते. हायड्रोजन तंत्रज्ञानावरील वाहने इतर इंधनापेक्षा किंवा इलेक्ट्रिक वाहनांपेक्षा अधिक असतात,” असे प्रतिपादन ऑस्ट्रेलियास्थित हायड्रोजन निर्मिती प्रकल्प साकारणारे डॉ. दिलावर सिंग यांनी केले.
टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर असोसिएशनतर्फे (टीटीए) आयोजित “ग्रीन हायड्रोजन : २१ व्या शतकाचे इंधन”वर या व्याख्यानात डॉ. सिंग बोलत होते. झूम मिटद्वारे झालेल्या या व्याख्यानावेळी “टीटीए”चे अध्यक्ष यशवंत घारपुरे, सचिव वसंत शिंदे, सहसचिव अजित चौगुले, डॉ. प्रमोद देशपांडे आदी उपस्थित होते. “टीटीए”चे हे ५८ वे व्याख्यान होते.
डॉ. दिलावर सिंग म्हणाले, “ग्रीन हायड्रोजन नवीन इंधन म्हणून उदयास येत आहे. बऱ्याच देशात या इंधनाचा वापर वाहने रेल्वे, विमान चालवण्यासाठी केला जातो. भारत सरकारला ८० टक्के क्रूड ऑइल आयात करावे लागते. याला ग्रीन हायड्रोजन उत्तम पर्याय आहे. याचा निर्मिती खर्च जास्त असला, तरी देशात तंत्रज्ञान विकसित करून मोठ्या प्रमाणात हायड्रोजनचे उत्पादन करून खर्च कमी होऊ शकतो.”
अजित चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. यशवंत घारपुरे यांनी आभार मानले.