धर्मादाय कार्यालयात झीरो पेंडन्सी मोहीम; १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 12:53 PM2018-02-01T12:53:04+5:302018-02-01T12:55:37+5:30
धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या अहवालानुसार राज्यातील धर्मादाय कार्यालयात प्राप्त झालेल्या बदल अर्जाची झीरो पेंडन्सी मोहीम येत्या १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत राबविली जाणार आहे.
पुणे : धर्मादाय कार्यालयाकडे नोंदणीकृत असलेल्या सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय व धार्मिक संस्थांचे बदल अर्ज वर्षानुवर्षे धर्मादाय कार्यालयाकडे प्रलंबित होते. राज्याचे प्रमुख धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या अहवालानुसार राज्यातील धर्मादाय कार्यालयात प्राप्त झालेल्या बदल अर्जाची झीरो पेंडन्सी मोहीम येत्या १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत राबविली जाणार आहे.
धर्मादाय कार्यालयाचे आठ विभाग असून प्रत्येक विभागात चार ते पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयांतर्फे सर्व अर्जांचा निपटारा करण्याचे उद्दिष्ट सहायक धर्मादाय आयुक्तांनी स्वीकारले आहे. राज्यात मुंबई विभागात २०९२, पुणे २,५९७,
नागपूर ७०५, अमरावती ९१०, नाशिक १,८७६, कोल्हापूर १,४१७, औरंगाबाद ६५९ आणि लातूर विभागात ४०० बदल अर्ज आहेत. आतापर्यंत १० हजार ६५६ बदल अर्ज निकाली काढण्यात आले आहे.