Zika Virus In Pune: महिला व तरुणाला झिका ची लागण; पुण्यात रुग्णांची संख्या बारावर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 12:31 PM2024-07-07T12:31:24+5:302024-07-07T12:31:54+5:30

महापालिकेकडून सदर भागांमध्ये कीटकशास्त्रीय व इतर उपाययोजना चालू करण्यात येणार

Zika infection in women and youth The number of patients in Pune is twelve | Zika Virus In Pune: महिला व तरुणाला झिका ची लागण; पुण्यात रुग्णांची संख्या बारावर

Zika Virus In Pune: महिला व तरुणाला झिका ची लागण; पुण्यात रुग्णांची संख्या बारावर

पुणे: शहरात झिकाचे आणखी 2 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कर्वेनगर परिसरात राहणारी एका खाजगी हॉस्पिटलमध्ये इन्शुरन्स डिपार्टमेंट मध्ये काम करणाऱ्या 42 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर, खराडी येथील एका 22 वर्षीय तरुणाचाही अहवाल शनिवारी उशिरा पॉझिटिव्ह आला असून शहरातील झिका रुग्णांची एकूण संख्या 12 वर पोचली आहे. 

 महिलेला एक ते दीड आठवड्यापासून व्हायरल फिवर सारखा त्रास वाटत होता, एक दिवस फिवर बरोबर रॅश आल्याने संबंधित रुग्णालयाच्या फिजिशियनने जी का व्हायरसचे सॅम्पल एन आय व्ही ला पाठवले असता ते पॉझिटिव्ह आले आहे. त्यामध्ये रक्ताची चाचणी निगेटिव्ह आणि युरीन रिपोर्ट पॉझिटिव आहे. 42 वर्षाची सदर महिला (गरोदर नसून)आता बरी झाली असून घरी आहे .सदर महिलेची सर्व ट्रीटमेंट ओपीडी बेसिस वर करण्यात आली आहे .तिच्या राहत्या भागात व हॉस्पिटलमध्ये केवळ एक किलोमीटरचे अंतर असून सदर भागामध्ये कीटकशास्त्रीय व इतर उपाययोजना चालू करण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. 

पुणे महानगरपालिकेच्या कोद्रे रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या खराडी गावातील एका बावीस वर्षे मुलाला एक दिवस ताप व रॅश आल्याने त्याचे सॅम्पल पाठवण्यात आले होते.  ते पॉझिटिव्ह आले आहे .सदर भाग येरवडा नगर रोड क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यकक्षेत येत असल्याने या ठिकाणी संबंधित परिमंडळ वैद्यकीय अधिकारी यांच्या पथकाद्वारे प्रतिबंधात्मक उपायोजना राबवण्यात येणार आहेत.

Web Title: Zika infection in women and youth The number of patients in Pune is twelve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.