पुण्यात झिकाचा रुग्ण आढळला, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर!

By ज्ञानेश्वर भोंडे | Published: November 15, 2023 07:36 PM2023-11-15T19:36:27+5:302023-11-15T19:38:02+5:30

पुण्यातील येरवडा परिसरात एक 64 वर्षीय ज्येष्ठ महिलेला डासांपासून होणाऱ्या झिका या आजराची लागण झाली असल्याचे आढळून आले आहे.

Zika virus patient found in Pune health system on alert mode | पुण्यात झिकाचा रुग्ण आढळला, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर!

पुण्यात झिकाचा रुग्ण आढळला, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर!

पुणे :

पुण्यातील येरवडा परिसरात एक 64 वर्षीय ज्येष्ठ महिलेला डासांपासून होणाऱ्या झिका या आजराची लागण झाली असल्याचे आढळून आले आहे. याची दखल घेत आरोग्य आयुक्त धीरज कुमार यांनी संपूर्ण जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना झिका प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत निर्देश दिले आहेत. 

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार या महिलेला 5 नोव्हेंबर रोजी ताप आला होता. तिच्या रक्ताचा नमुना 10 नोव्हेम्बर ला पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एन आय व्ही) ला पाठवला. 11 नोव्हेंबर रोजी तिचा झिका पॉझिटीव्ह अहवाल आला. ती 15 ऑक्टोबर ला केरळ ला गेली होती, तेव्हा तिला झिका ची बाधा झाल्याची शक्यता आहे. 

यानुसार दि. 15 नोव्हेंबर रोजी साथरोग विभागाचे सहसंचालक डॉ. प्रताप सिंह सारणीकर यांनी झिका रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी प्रतिक नगर येरवडा येथे प्रत्यक्ष रुग्णाची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली व तब्येतीची काळजी घेणे बाबत सांगितले. त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिका येथील कर्मचारी यांना झिका रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याचे आदेश दिले.

एक 64 वर्षाची येरवडा येथील महिला झिका साठी पॉझिटिव्ह आढळली. तिला 5 नोव्हेंबर रोजी ताप आला होता. तिचा झिका पॉझिटीव्ह अहवाल आला. ती 15 ऑक्टोबर ला केरळ ला गेली होती, तेव्हा तिला झिका ची बाधा झाल्याची शक्यता आहे. आता तिची तब्येत स्थिर आहे. तिच्या कुटुंबातील 5 जणांचे रक्त तपासणीसाठी घेतले आहे, त्यांना कोणतेही लक्षणे नाहीत. 
 - डॉ. प्रतापसिंह सारणीकर, सहसंचालक, आरोग्य विभाग

Web Title: Zika virus patient found in Pune health system on alert mode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.