आष्टापूरला जिल्हा परिषदेचा हगणदारीमुक्त गाव पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:15 AM2021-08-20T04:15:54+5:302021-08-20T04:15:54+5:30
या वेळी हवेलीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, विस्तार अधिकारी शिरीष मोरे यांनी भेट देऊन ग्रामपंचायतीचे कौतुक केले. तसेच भविष्यकाळात ...
या वेळी हवेलीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, विस्तार अधिकारी शिरीष मोरे यांनी भेट देऊन ग्रामपंचायतीचे कौतुक केले. तसेच भविष्यकाळात हेच सातत्य राखण्याचे आवाहन नागरिकांना केले. पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप म्हणाले, आजपर्यंत शासनाकडून आलेल्या सर्व योजना या ग्रामपंचायतीमध्ये राबवून गावातील सर्वच नागरिक मनापासून आपले कर्तव्य पार पाडत असल्यानेच हा पुरस्कार आष्टापूर ग्रामपंचायतीला मिळाला आहे.
जिल्ह्यात स्वच्छता अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, स्वच्छ भारत मिशन (ग्रा) पहिल्या टप्प्यांतर्गत मार्च २०१७ मध्ये जिल्हा हगणदारीमुक्त केला. स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा दोन अंतर्गत जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये वैयक्तिक शौचालयाप्रमाणेच शाळा, अंगणवाडी व येणारे अभ्यागतांकरिता स्वच्छतेच्या सुविधा व गावात सार्वजनिक ठिकाणी, शाळा, अंगणवाडी येथे घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करून गावे शाश्वत स्वच्छ करण्यात येत आहे.
गावातील प्रत्येक कुटुंब शौचालयाचा वापर करत असून गावातील ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी केंद्र, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तसेच इतर सर्व शासकीय संस्थांना शौचालय युनिट आहेत. तसेच ७५ पेक्षा जास्त कुटुंबांनी शोषखड्डे घेतलेले आहेत. यावेळी जिल्हा परिषद सदस्या कल्पना जगताप, पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप, अष्टापूरच्या सरपंच कविता जगताप, उपसरपंच कालिदास कोतवाल, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ कोतवाल, ग्रामविकास अधिकारी ज्योत्स्ना बगाटे, योगेश जगताप, शिक्षक, अंगणवाडीसेविका, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत गावपाहणी केली.
१९ उरुळीकांचन
190821\img_20210819_185710.jpg
आष्टापूर गावाला जिल्हा परिषदेच्या हागणदारीमुक्त गाव पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यावर आनंद व्यक्त करताना पदाधिकारी व सदस्य