जलयुक्त शिवारच्या कामात जिल्हा परिषदेची उदासिनता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 09:27 PM2018-10-13T21:27:39+5:302018-10-13T21:33:01+5:30

जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत केला जाणा-या कामांकडे जिल्हा परिषदेच्या छोटे पाटबंधारे विभाग व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून दुर्लक्ष होत आहे

Zilla Parishad's unconcious to the jalyukta shivar work | जलयुक्त शिवारच्या कामात जिल्हा परिषदेची उदासिनता

जलयुक्त शिवारच्या कामात जिल्हा परिषदेची उदासिनता

googlenewsNext
ठळक मुद्देलघु पाटबंधारे विभागाचे केवळ ३३ टक्के काम पूर्णपुणे जिल्ह्यातील कृषी विभागाकडे सर्वाधिक २ हजार ७६९ कामे प्रस्तावित जलयुक्तची प्रस्तावित कामे सुरू करण्यास काही शेतकऱ्यांचा विरोध

पुणे: जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत केला जाणा-या कामांकडे जिल्हा परिषदेच्या छोटे पाटबंधारे विभाग व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून दुर्लक्ष होत आहे. या दोन्ही विभागांकडे सोपविण्यात आलेली अनेक कामे रखडली आहेत. तसेच जलसंपदा पुणे पाटबंधारे विभागाकडे प्रस्तावित केलेल्या कामांपैकी एकही काम झालेले नाही.
सततचा दुष्काळ आणि पाणी टंचाई यावर उपाय योजना म्हणून राज्य शासनातर्फे जलयुक्त शिवार अभियान सुरू करण्यात आले.स्वयंसेवी संस्थांनी या कामात मोठे योगदान दिले आहे.तसेच काही शासकीय कार्यालयांनी सुध्दा या कामात पुढाकार घेतला आहे.पुणे जिल्ह्यातील कृषी विभागाकडे सर्वाधिक २ हजार ७६९ कामे प्रस्तावित करण्यात आली होती.कृषी विभागाने त्यातील २,५३० कामे पूर्ण केली आहेत.तर पुणे पाटबंधारे विभागाकडे 7 कामे प्रस्तावित केली होती.त्यातील एकही काम अद्याप सुरू करण्यात आलेले नाही.
पुणे,भोर,जुन्नर येथील वनविभाग,समाजिक वनविभाग आणि भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडे सूपूर्द करण्यात आलेली १०० टक्के कामे पूर्ण झाली आहेत.वन विभागाने एकूण १ हजार १३३ कामे केली असून भूजलतर्फे ४४० कामे पूर्ण करण्यात आली.मात्र,विभागातील ३६५ कामे अजूनही अपूर्ण आहेत.जिल्हा प्रशासनाकडून ही कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो.मात्र,काही शेतकरीच जलयुक्तची प्रस्तावित कामे सुरू करण्यास विरोध करत आहेत. शेतक-यांच्या जमिनींमधून ट्रक किंवा जेसीबी जात असल्याने काही नागरिक ही कामे सुरू करू देत नाहीत.त्यामुळे बहुतेक कामे रखडली आहेत,असे जिल्हा प्रशासनातील अधिका-यांकडून सांगितले जात आहे. 
नाला खोलीकरण,शेततळी,लघु बंधारे,बांध बंदिस्त करणे,सिंमेंट बंधारे,पाझर तलाव,विहरी बोअरवेल पुनर्रभरण यंत्रणा आदी कामे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत केली जातात.या योजने अंतर्गत प्रामुख्याने पावसाचे पाणी गावातच जिरवून भूजल पाणी पातळीत वाढ करण्यावर भर दिला जात आहे.मात्र,जिल्हा परिषदेच्या विभागांकडून त्यास हवा तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे.
-------------------

Web Title: Zilla Parishad's unconcious to the jalyukta shivar work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.