वाह रे गुरुजी! प्राथमिक शिक्षकांची विद्यार्थ्यांसमोरच हाणामारी; घटनेचा व्हिडिओ वायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 01:37 PM2022-12-17T13:37:18+5:302022-12-17T13:42:56+5:30

पालकांकडून त्यांच्या बदलीची मागणी....

zp Primary teachers clash in front of students; Incidents in Pune district | वाह रे गुरुजी! प्राथमिक शिक्षकांची विद्यार्थ्यांसमोरच हाणामारी; घटनेचा व्हिडिओ वायरल

वाह रे गुरुजी! प्राथमिक शिक्षकांची विद्यार्थ्यांसमोरच हाणामारी; घटनेचा व्हिडिओ वायरल

googlenewsNext

इंदापूर (पुणे) : चाकाटी (ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी आपापसात हाणामारी केली. शुक्रवारी (दि. १६) सायंकाळी शाळा सुटण्याच्या वेळी विद्यार्थ्यांसमोर हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ वायरल झाला आहे. या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या शिक्षकांची बदली करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. नवीन शिक्षक येईपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

सुभाष ब. भिटे, उद्धव कुंडलिक गरगडे, संजीवनी गरगडे अशी भांडणे करणा-या शिक्षकांची नावे आहेत. भिटे व संजीवनी गरगडे हे चाकाटीच्या जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत. संजीवनी गरगडे यांचे पती उद्धव गरगडे हे लाखेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी भिटे व संजीवनी गरगडे यांची कुरबूर झाली. त्यानंतर शाळा सुटताना उद्धव गरगडे आल्यानंतर दोघांविरुध्द एक अशी धुमश्चक्री सुरु झाली.

विद्यार्थ्यांसमोर प्रकार

घरी जाणा-या विद्यार्थ्यांसमोर हा प्रकार घडला. त्यांनी या हाणामारीचे फोटो काढले. मोबाईलवर चित्रण केले. ते वा-याच्या वेगाने वायरल झाले. या प्रकारानंतर पालक स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी निवेदन तयार केले. त्यावर इतर पालकांच्या सह्या घेतल्या. गट शिक्षण अधिका-यांना निवेदन दिले.

शिक्षकांची तातडीने बदली करण्याची मागणी-

या शिक्षकांमध्ये वारंवार वादविवाद होतात. हाणामारी होते.त्यामुळे पाल्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. पाल्यांना शाळेच्या अभ्यासक्रमातील काहीही येत नाही. त्यामुळे या दोन्ही शिक्षकांची तातडीने बदली करण्यात यावी. नवीन शिक्षक येईपर्यंत आम्ही सर्व जण शाळा बंद करीत आहोत,असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनाखाली ३५ पालकांच्या सह्या आहेत.

पालकांमध्ये संतापाचे वातावरण-

जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षणाच्या दर्जाबद्दल अनेकदा संमिश्र मते व्यक्त होत असतात. गरीबांच्या मुलांच्या शिक्षणाची किमान सोय होते, म्हणून या शाळांची भलावण केली जाते. मात्र भलावण करणाऱ्यांची बोलती बंद करणारे कृत्य या शिक्षकांनी केल्यामुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: zp Primary teachers clash in front of students; Incidents in Pune district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.