झुल्फिकार बडोदावालाही पुरवायचा दहशतवाद्यांना पैसे; दहशतवादी प्रकरणातील पाचवा आरोपी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 01:18 PM2023-08-03T13:18:35+5:302023-08-03T13:20:04+5:30

बडोदावाला याने दोन दहशतवाद्यांना दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरवले

Zulfiqar also used to supply money to terrorists in Baroda Fifth accused in terror case | झुल्फिकार बडोदावालाही पुरवायचा दहशतवाद्यांना पैसे; दहशतवादी प्रकरणातील पाचवा आरोपी

झुल्फिकार बडोदावालाही पुरवायचा दहशतवाद्यांना पैसे; दहशतवादी प्रकरणातील पाचवा आरोपी

googlenewsNext

पुणे : कोथरूडमधून अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक केलेला झुल्फिकार बडोदावाला याने दहशतवाद्यांना कारवायांसाठी पैसे पुरवले आहेत. त्याने या दोघांशी वेळोवेळी फोनवरून संपर्कदेखील साधला असल्याचे राज्य दहशतवादीविरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या तपासातून समोर आले आहे.

दहशतवाद्यांना पैसे पाठविणाऱ्या मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या सिमाब नसरुद्दीन काझी याला नुकतीच अटक करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ बडोदावालावर कारवाई करण्यात आली. बडोदावाला हा राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) कोठडीत होता. न्यायालयाची परवानगी घेऊन त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. आतापर्यंत या गुन्ह्यात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी (दि.२) सकाळी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. बडोदावाला याने महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान आणि महम्मद युसूफ महम्मद याकूब साकी या दोन दहशतवाद्यांना दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरवले आहेत. त्याने या दोघांशी वेळोवेळी फोनवरून संपर्कदेखील साधला आहे. बडोदावालाला या गुन्ह्यात आणखी कोणी मदत केली, त्याने नेमकी किती रक्कम दहशतवाद्यांना दिली, या सर्वांचा तपास करण्यासाठी त्याला एटीएस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील विजय फरगडे यांनी केला. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून सत्र न्यायाधीश एस.व्ही. कचरे यांनी बडोदावालाला ११ ऑगस्टपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे.

या गुन्ह्यात आतापर्यंत पकडलेले आरोपी

पोलिस आणि एटीएसने महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान (वय २३) आणि महम्मद युसूफ महम्मद याकूब साकी (वय २४, दोघेही रा. चेतना गार्डन, मिठानगर, कोंढवा), दहशतवाद्यांना आश्रय देणारा अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (वय ३२, रा, कोंढवा) आणि आर्थिक रसद पुरविणारा सिमाब नसरुद्दीन काझी (वय २७, रा. कोंढवा) यांना अटक केली आहे. या सर्वांना पाच ऑगस्टपर्यंत एटीसएस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: Zulfiqar also used to supply money to terrorists in Baroda Fifth accused in terror case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.