पत्नीने केली पतीची हत्या

By admin | Published: June 24, 2017 12:04 AM2017-06-24T00:04:25+5:302017-06-24T00:04:25+5:30

नजीकच्या मांडवा येथील बळीराम कास्देकर यांची हत्या पत्नीने केल्याचा खुलासा झाला आहे.

Wife murdered husband | पत्नीने केली पतीची हत्या

पत्नीने केली पतीची हत्या

Next

मांडवा येथील घटना : गळा आवळून खून
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : नजीकच्या मांडवा येथील बळीराम कास्देकर यांची हत्या पत्नीने केल्याचा खुलासा झाला आहे. धारणी पोलिसांनी याप्रकरणी पत्नी जीजीबाई रामलाल कास्देकर (४०,रा. मांडवा) हिला अटक केली आहे. तिने आपल्या जबाबात हत्या केल्याचे कबूल केले.
बळीराम हिराजी कास्देकर (३९, रा. टाकरखेडा) यांचा २० जून रोजी मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्युचा गुन्हा दाखल केला होता. प्राप्त माहितीनुसार, बळीरामच्या पहिल्या पत्नीचा दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला तर आरोपी जिजीबाई Þहिच्या पतीचा देखील मृत्यू झाला होता. बळीराम व जीजीबाई हे दोघेही वर्षभरापासून एकमेकांसोबत एकत्र राहात होते. बळीरामला व्यसन असल्याने त्यांच्यात नेहमीच वाद व्हायचे. २० जूनला त्यांच्यात वाद झाला. या वादातूनच पत्नी जीजीबाई हिने मध्यरात्री टॉवेलने गळा आवळून त्याची हत्या केली. मात्र, २२ जून रोजी बळीरामचा भाऊ शंकर कास्देकर याने बळीरामची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला. शवविच्छेदन अहवालातही बळीरामचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी जीजीबाईची चौकशी केली. यानंतर तिने बळीरामची हत्या केल्याची कबुली दिली. याप्रकरणी धारणी पोलिसांनी जीजीबाईविरूद्ध ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याप्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी जीजीबाईची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Wife murdered husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.