राजस्थानमध्ये राजकीय हालचालींना वेग, १७ नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 05:05 PM2023-07-22T17:05:52+5:302023-07-22T17:06:11+5:30

राजस्थान भाजपचे प्रभारी अरुण सिंह, प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी आणि विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड यांच्या उपस्थित या सर्व नेते पक्षात सामील झाले. 

17 leaders joined BJP in Rajasthan | राजस्थानमध्ये राजकीय हालचालींना वेग, १७ नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश!

राजस्थानमध्ये राजकीय हालचालींना वेग, १७ नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश!

googlenewsNext

जयपूर : राजस्थानमध्ये सर्वांनाच आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांकडून जोरात सुरू झाली आहे. दरम्यान, राजस्थानमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. येथील विविध पक्षांच्या अशा जळपास १७ नेत्यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राजस्थान भाजपचे प्रभारी अरुण सिंह, प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी आणि विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड यांच्या उपस्थित या सर्व नेते पक्षात सामील झाले. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी म्हणाले की, सर्वांनी पक्षात बिनशर्त प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयासाठी सर्वांनीच संकल्प केला आहे. राजधानी जयपूर येथील भाजपच्या मुख्यालयात या सर्व १७ नेत्यांना पक्षात प्रवेश केला. यामध्ये माजी आयपीएस जसवंत संपतराम, लल्लुराम बैरवा, केआर मेघवाल, डॉ. शिवचरण कुशवाह, रवींद्र सिंह बोहरा, पवन दुग्गल, विवेक सिंह बोहरा, राणी दुग्गल, माजी आयएएस डॉ. एसपी सिंह आणि मनोज शर्मा, ममता कंवर, डीडी कुमावत, धनसिंग रावत, दिनेश रंगा आणि गीता वर्मा यांचा समावेश आहे.

अरुण सिंह यांचा दावा- भाजप प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करेल
राजस्थान भाजपचा परिवार आणखी वाढला आहे, असे राज्याचे प्रभारी अरुण सिंह म्हणाले. तसेच, राजस्थानमध्ये भाजपची लाट आहे. भाजप प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करेल, असा दावा अरुण सिंह यांनी केला. याशिवाय, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सत्य बोलल्याबद्दल आपल्या मंत्र्याला बडतर्फ केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, राजस्थानमध्ये हाहाकार माजल्याची स्थिती आहे. सगळीकडे अनागोंदी कारभार आहे. त्यामुळे इतके कमी काँग्रेसचे आमदार येतील की ते फॉर्च्युनरमध्ये बसून जातील, असेही अरुण सिंह म्हणाले.

तिवारी आणि महारिया यांचीही झालीय 'घरवापसी'
विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षापूर्वी माजी केंद्रीय मंत्री सुभाष महारिया भाजपमध्ये परतले होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन सुभाष महारिया यांनी पक्ष सोडला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तसेच, त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. पण पराभूत झाले. दुसरीकडे, गेल्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री घनश्याम तिवारी यांनीही भाजपला सोडचिठ्ठी देत ​​आपला नवा पक्ष स्थापन केला होता. पण त्या पक्षाला यश आले नाही. त्यानंतर तिवारी काँग्रेसमध्ये गेले. पण नंतर ते भाजपमध्ये आले. आता पक्षाने घनश्याम तिवारी यांना राजस्थानमधून खासदार म्हणून राज्यसभेवर पाठवले आहे.

Web Title: 17 leaders joined BJP in Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.