राजस्थानमध्ये ईडीची मोठी कारवाई! आयएएस अधिकाऱ्यांसह २५ ठिकाणी छापा; नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 10:44 AM2023-11-03T10:44:05+5:302023-11-03T10:44:05+5:30
ईडीने आज सकाळीच राजस्थानमधील काही ठिकाणी छापे टाकले आहेत.
ईडीने आज सकाळी राजस्थानमध्ये मोठी कारवाई केली आहे, ईडीने राजस्थानमधील २५ ठिकाणी छापे टाकले आहेत. राजस्थानमध्ये छापे टाकण्यात आलेले छापे एका IAS अधिकाऱ्याच्या ठिकाणांसह एकूण २५ ठिकाणी टाकले जात आहेत. जलजीवन मिशन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीची ही कारवाई करण्यात आली आहे. राजस्थानमध्ये गेल्या काही आठवड्यात अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. राजधानी जयपूरपासून अनेक मोठ्या शहरांमध्ये ईडीची कारवाई करण्यात आली आहे.
राजस्थानमधील अँटी करप्शन ब्युरोने परमचंद जैन यांच्यासह खासगी कंत्राटदारांवर कराराशी संबंधित अनियमितता लपविण्यासाठी बेकायदेशीर सुरक्षा, निविदा, बिले मंजूर करणे आणि अधिकाऱ्यांना लाच दिल्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवण्यात आला. या सर्वांनी सार्वजनिक आरोग्य आणि अभियांत्रिकी विभागाच्या अधिकाऱ्यांना लाच दिली. यानंतर ईडीने जल जीवन मिशनशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास सुरू केला.
भाजपचे राज्यसभा खासदार किरोरी लाल मीणा यांनी जूनमध्ये राजस्थानमध्ये जल जीवन मिशन राबविण्याच्या नावाखाली २० हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. मिशनच्या ४८ प्रकल्पांमध्ये बनावट अनुभव प्रमाणपत्राच्या आधारे दोन कंपन्यांना ९०० कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
किरोनी लाल मीना म्हणाले होते की, 'केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत २००० कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. हे सर्व पीएचईडी मंत्री आणि विभागाचे सचिव यांच्या माध्यमातून संयुक्तपणे करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या जल जीवन मिशनचा उद्देश घरगुती नळ जोडणीद्वारे सुरक्षित आणि पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी पुरविणे हा आहे.
या अगोदर सप्टेंबर महिन्यात ईडीने छापा टाकला होता. जयपूरमध्ये जल जीवन मिशन संदर्भात अनेक बँक लॉकरांचा तपास केला आहे. यात ५.८६ कोटी रुपयांचे सोनं आणि चांदी जप्त केलं. ईडीला एकुण ९.६ किलो सोनं आणि ६.३ किलो चांदी सापडली आहे.