भाजप कार्यकर्त्यांचे मत काँग्रेसच्या गेहलोत यांनाच, प्रचार दौऱ्यांमध्ये स्थानिक नेत्यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 12:26 PM2023-11-11T12:26:41+5:302023-11-11T12:27:23+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीत ते (गेहलोत) सलग सहाव्या वेळेस निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गेहलोत अजिंक्य असल्याचे छातीठोकपणे सांगणारे बिश्नोई हे एकटे नाहीत.
जोधपूर : येथे काँग्रेसचेच नाहीतर भाजपचे कार्यकर्तेही मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना मतदान करतात, असे सरदारपुरा विधानसभा मतदारसंघातील रहिवासी हरदेव बिश्नोई यांनी सांगितले. सरदारपुरा हा गेहलोत यांचा प्रदीर्घ काळापासून बालेकिल्ला आहे. सरदारपुरात आम्ही केवळ आमदाराला मत देत नाही तर मुख्यमंत्र्याला मत देतो, असे बिश्नोई म्हणाले.
आगामी विधानसभा निवडणुकीत ते (गेहलोत) सलग सहाव्या वेळेस निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गेहलोत अजिंक्य असल्याचे छातीठोकपणे सांगणारे बिश्नोई हे एकटे नाहीत.
जोधपूरमध्ये झाला सर्वांगीण विकास
गेल्या काही वर्षांत जोधपूर येथे एम्स, आयआयटी, एनआयएफटी, विधी विद्यापीठ अशा अनेक शैक्षणिक संस्था उभा राहिल्या. जिल्ह्याला चांगले रस्ते आणि पायाभूत सुविधा मिळाल्या आहेत. हे सर्व गेहलोत यांच्यामुळे झाले, असे भाटी म्हणाले.